ETV Bharat / state

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : सुनील पाटील आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल - Sunil Patil reached to Azad Maidan police station

आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणातील महत्त्वाची व्यक्ती सुनील पाटील काही वेळापूर्वी आझाद मैदान पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत. आझाद मैदान पोलिसांकडे सुनील पाटील हे आपला जबाब नोंदवणार आहे. काळ्या पिवड्या टॅक्सीतून आझाद मैदान पोलीस ठाण्यात ते पोहोचले.

Azad Maidan police station
आझाद मैदान पोलीस ठाणे
author img

By

Published : Nov 7, 2021, 5:57 PM IST

Updated : Nov 7, 2021, 7:09 PM IST

मुंबई - मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अनेक नवीन नवीन खुलासे होत आहे. त्यामध्ये आता पुन्हा गेल्या अनेक दिवसांपासून सुनील पाटील यांचे नाव समोर येत होतं ते आज अखेर मुंबई आजाद मैदान पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाले. मुंबई आझाद मैदान पोलिसांनी त्यांना मुंबई एसआयटीकडे घेऊन गेले आहे. आता मुंबई एसआयटी त्यांची जबाब नोंदवणार आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या केबिनमध्ये सुनील पाटील याने भेट घेतली. त्यानंतर सुनील पाटील याला मुंबई पोलीस एका जीपमधून झोन एकला घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. याच ऑफिसमध्ये SIT चे ऑफिस आहे. त्यामुळे याप्रकरणी आणखी नवीन माहिती समोर येण्याची चिन्हे आहेत.

सुनील पाटील या प्रकरणाचे मास्टरमाइंड - मोहित भारतीय

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आरोप-प्रत्यारोप प्रकरणानंतर आता हालचालींना वेग आला आहे. भाजपचे नेते मोहित भारतीय यांनी सुनील पाटील याचा उल्लेख केला होता. सुनील पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहे आणि ते खरे या प्रकरणाचे मास्टरमाइंड आहे, असा आरोप भाजप नेते मोहित भारतीय यांनी केला होता. आज नवाब मलिक यांनी या सर्व आरोप फेटाळून लावले असून सुनील पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसची कोणताही संबंध नाही. तसेच माझीसुद्धा केव्हा सुनील पाटील यांच्याशी भेट झालेली नाही आहे, असे स्पष्टीकरण नवाब मलिक यांनी आज दिले.

हेही वाचा - नवाब मलिकांच्या पुराव्यामुळे भाजपमध्ये देखील खळबळ - आमदार रोहित पवार

मोहित भारतीय यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन सुनील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे काय संबंध आहे यासंदर्भात व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप जारी करून माहिती दिली होती. मात्र, त्याला आज नवाब मलिक यांनी प्रतिउत्तर देत सुनील पाटील यांचे संबंध भारतीय जनता पार्टीचे नेत्यांशी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत देखील सुनील पाटील यांचे फोटो आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला. सुनील पाटील हे समीर वानखडे यांच्या आर्मीचा एक भाग आहेत, ज्याप्रमाणे समीर वानखडे लोकांना बसण्याकरिता आर्मीचा सदस्य बनवले आहे, त्यामध्ये मोहित भारतीय हेदेखील आहे.

अखेर सुनील पाटील मुंबई पोलीस स्टेशनला दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील पाटील आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर झाले आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी सुनील पाटीलवर सूत्रधार असल्याचा आरोप केला होता. याच प्रकरणात सुनील पाटील तक्रार दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Last Updated : Nov 7, 2021, 7:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.