ETV Bharat / state

विधानसभेतही वाघांची संख्या वाढेल; सुधीर मुनगंटीवारांचे सूचक वक्तव्य

लोकसभेत शिवसेना वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. तशीच विधानसभेतही वाघांची संख्या वाढेल, असे सांगत विधानसभेतही शिवसेनेचे संख्याबळ वाढेल, असा विश्वास राज्याचे वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

विधानसभेतही वाघांची संख्या वाढेल; सुधीर मुनगंटीवारांचे सूचक वक्तव्य
author img

By

Published : Jun 5, 2019, 5:04 PM IST

Updated : Jun 5, 2019, 5:36 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपांवरून शिवसेना-भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. या जागावाटपांवरून शिवसेनेमध्ये नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर लोकसभेत शिवसेना वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. तशीच विधानसभेतही वाघांची संख्या वाढेल, असे सांगत विधानसभेतही शिवसेनेचे संख्याबळ वाढेल, असा विश्वास राज्याचे वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

विधानसभेतही वाघांची संख्या वाढेल; सुधीर मुनगंटीवारांचे सूचक वक्तव्य

महापालिका सभागृहात गोरेगाव आरे येथील जागेवर आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय बनवण्यासाठीचा राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेमध्ये सामंजस्य करार झाला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी, वन विभागाचे सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते. यावेळी सुधीर मुनगंटीवार बोलत होते.

यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, राज्यात आमचे सरकार यायच्या आधी २०१४ मध्ये वाघांची संख्या २०४ होती आता त्यात वाढ होऊन सध्या २५० वाघांची संख्या झाली आहे. वाघांचे लहान बछडे १०१ होती, त्यात वाढ होऊन २५० झाली आहे. याचाच धागा पकडत येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे संख्याबळही वाढेल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरेंचे स्वप्न पूर्ण केले -

लोकसभा निवडणुकीसाठी युतीची पहिली सभा कोल्हापूर येथे झाली होती. त्या सभेवरून मुंबईला परतताना उद्धव ठाकरे यांनी आपली काही स्वप्ने मला सांगितली. उद्धव ठाकरे हे प्राणीप्रेमी आहेत. त्यांनी आरेमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी संग्रहालय उभारण्याचे स्वप्न पाहिले आहे. ते स्वप्न राज्य सरकार पूर्ण करेल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. उद्धव यांचे मुंबई सुंदर करण्याचे स्वप्न आहे तेही लवकरच पूर्ण होईल. त्यासाठी मी वित्तमंत्री असल्याने वाटेल तितका निधी देईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

प्राणीशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यापीठ -

गोरेगांव येथील आरे कॉलनीमध्ये उभे राहणारे प्राणीसंग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणार आहे. या प्राणीसंग्रहालयात प्राणीशास्त्राचा अभ्यास करता येणार आहे. त्यामुळे हे प्राणीशास्त्राचा अभ्यास करणारे केंद्रीय विद्यापीठ असेल. या प्राणी संग्रहालयातून मिळणाऱ्या महसुलातून ८० टक्के महसूल पालिकेला तर २० टक्के महसूल राज्य सरकारला मिळणार आहे. त्यामुळे राज्य सरकारचा फायदा होणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

आरेतील रहिवाशांचे नुकसान होणार नाही -

आरेमध्ये आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना विस्थापित व्हावे लागणार आहे. याला येथील स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. त्यांनी याबाबत आंदोलनाचा इशारा दिला असला तरी हे प्राणीसंग्रहालय होताना कोणालाही त्रास होणार नाही, आदिवासी आणि स्थानिक रहिवाशांचे आर्थिक नुकसान होणार नाही, याची काळजी सरकार घेईल असेही मुनगंटीवार यांनी संगितले.

Intro:मुंबई
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपांवरून चर्चा सुरु आहे. या जागावाटपांवरून शिवसेनेमध्ये नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. तशीच विधानसभेतही वाघांची संख्या वाढेल असे सांगत शिवसेनेचे संख्याबळ वाढेल असा विश्वास राज्याचे वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. Body:शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी, वन विभागाचे सचिव विकास खारगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महापालिका सभागृहात गोरेगांव आरे येथील जागेवर आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय बनवण्यासाठीच्या सामंजस्य करार राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेत झाला त्यावेळी मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना राज्यात आमचे सरकार यायच्या आधी २०१४ मध्ये वाघांची संख्या २०४ होती आता त्यात वाढ होऊन सध्या २५० वाघांची संख्या झाली आहे. वाघांचे लहान पिल्ले १०१ होती त्यात वाढ होऊन २५० झाली आहे. याचाच धागा पकडत येत्या विधसनसभा निवडणुकीत शिवसेनेचे संख्याबळही वाढेल असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरेंचे स्वप्न पूर्ण केले -
लोकसभा निवडणुकीची युतीची पहिली सभा कोल्हापूर येथे झाली. त्या सभेवरून मुंबईला परतताना उद्धव ठाकरे यांनी आपली काही स्वप्ने मला सांगितली. उद्धव ठाकरे हे प्राणीप्रेमी आहेत. त्यांनी आरेमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी संग्रहालय उभारण्याचे स्वप्न पाहिले आहे. ते स्वप्न राज्य सरकार पूर्ण करेल असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. उद्धव यांचे मुंबई सुंदर करण्याचे स्वप्न आहे ते स्वप्नही लवकर पूर्ण झाले पाहिजे. त्यासाठी मी वित्तमंत्री असल्याने वाटेल तितका निधी देईल असे मुनगुंटीवार यांनी सांगितले.

प्राणीशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यापीठ -
गोरेगांव येथील आरे कॉलनीमध्ये उभे राहणारे प्राणीसंग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणार आहे. या प्राणीसंग्रहालयात प्राणीशास्त्राचा अभ्यास करता येणार आहे. यामुळे ते प्राणीशास्त्राचा अभ्यास करणारे केंद्रीय विद्यापीठ असेल. या प्राणी संग्रहालयातून मिळणाऱ्या महसुलातून ८० टक्के महसूल पालिकेला तर २० टक्के महसूल राज्य सरकारला मिळणार आहे. यामुळे राज्य सरकारचा फायदाच होणार आहे असे मुनगुंटीवार यांनी सांगितले.

आरेतील रहिवाशांचे नुकसान होणार नाही -
आरेमध्ये आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय होत आहे. यामुळे येथील नागरिकांना विस्थापित व्हावे लागणार आहे. याला तेथील स्थानिक नागरिकांचा विरोध होत आहे. त्यांनी याबाबत आंदोलनाचा इशारा दिला असला तरी हे प्राणीसंग्रहालय होताना कोणालाही त्रास होणार नाही, आदिवासी आणी स्थानिक रहिवाशांचे आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेईल असे मुनगंटीवार यांनी संगितले.

बातमीसाठी vis, मुनगंटीवार यांच्या भाषणाचा व्हिडीओ Conclusion:
Last Updated : Jun 5, 2019, 5:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.