मुंबई : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी सातत्याने आपल्या मागणीसाठी पाठपुरावा केलेला होता. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे तसेच डॉ. रणजित पाटील यांच्यामार्फत तसेच सत्ताधारी पक्षातील काही आमदारांद्वारे देखील विद्यार्थ्यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. मात्र त्या मागणीला अद्यापही यश येत नसल्याने विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना भेटून या मागणी संदर्भात विनंती केली होती. विद्यार्थ्यांच्या भावना मांडण्यासाठीच रोहित पवार यांनी आज या संदर्भातली कळकळीची मागणी शासनाकडे मांडली. शासनाने या संदर्भातला निर्णय घेण्याच्या आधीच रोहित पवार यांचे वक्तव्य प्रसार माध्यमात प्रसारित झाले. त्यामुळे एमपीएससी नविन अभ्यास क्रमाची उत्सुकता ताणली गेली होती.
राज्य सरकार करणार विनंती : आमदार रोहित पवार यांच्या प्रस्ताव नंतर मंत्रिमंडळ समिती सदस्यांनी गंभीर विचार सुरू केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देखील सकारात्मक विचार करावा अशी विनंती केली. त्या आधारावर आता लवकरच सुधारित एमपीएसी अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याची शिफाकर राज्य सरकार करणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगासंदर्भातला कोणताही निर्णय करायचा असेल तर आयोगच स्वतः करू शकतो. त्याचे कारण हा आयोग स्वायत्त आहे. याला संविधानिक अधिकार बहाल केले गेले आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळ फार फार तर केवळ विनंती सूचना किंवा प्रस्ताव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे दाखल करू शकते.
आयोग स्वायत्त : आहे याबाबत प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, 'राज्य मंत्रिमंडळाला या संदर्भात अंतिम निर्णय करण्याचा अधिकार नाही. त्याचे कारण एमपीएससी ही स्वायत्त वैधानिक संस्था आहे. म्हणूनच राज्य मंत्रिमंडळ या संदर्भात विनंती करू शकते'. ती विनंती महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला करणार आहे. त्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करता येत नाही. म्हणून याबाबत एमपीएससी अंतिम निर्णय करेल, असे मुनगंटीवार यांनी नमूद केले.'
अभ्यासक्रम 2025 पासून लागू करा : यासंदर्भात एमपीएससीच्या अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा ही मागणी करणारे विद्यार्थ्यांनी आता डोळे लावून बसले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग याबाबत निर्णय केव्हा करणार, या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार का?; हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यासंदर्भात एमपीएससीची परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी रोहित उबाळे यांनी सांगितले की, नविन अभ्यासक्रम दोन वर्षांनी लागू करावा अभ्यासक्रमा संदर्भात आमची कोणतीही तक्रार नाही.'
हेही वाचा - State Cabinet Decisions : 'जय जय महाराष्ट्र माझा'ला राज्य गीताचा दर्जा, वाचा मंत्रिमंडळाचे महत्वपूर्ण निर्णय