मुंबई Sudhir More suicide case : घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळ रुळावर ठाकरे गटाचे नेते सुधीर मोरे यांचा मृतदेह गुरुवारी रात्री आढळला होता. मृतदेहाचे अनेक तुकडे झाले होते. सुधीर मोरे यांनी लोकल ट्रेनसमोर येऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. एक महिला सुधीर मोरेंना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती समोर आली होती. सुधीर मोरे यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनंतर नीलिमा चव्हाण सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुधीर मोरे यांनी आत्महत्या केलेल्या दिवशी मोरे आणि नीलिमा यांच्यात 50 ते 60 फोन कॉल झाले होते. शेवटचा कॉल हा एक मिनिट 17 सेकंदांचा होता. त्याचप्रमाणे सुधीर मोरे यांनी रेकॉर्ड केलेल्या कॉलमध्ये एका महिलेवरून नीलिमा आणि सुधीर मोरे यांच्यात वाद निर्माण झाला होता असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही तिसरी महिला कोण याचाच तपास आता रेल्वे पोलीस करत आहेत.
नीलिमा चव्हाण बेपत्ता?नीलिमा चव्हाण सावंत यांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय भारतीय दंड संविधान कलम 306 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी अद्याप पाच जणांचे जबाब नोंदवले आहेत. नीलिमा चव्हाण यांचे विक्रोळी आणि मुलुंड येथील घरी पोलिसांनी जाऊन शोध घेतला असता त्या आढळून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांना 41(अ ) ची नोटीस पोलिसांना अद्याप देता आलेली नाही. नीलिमा चव्हाण सावंत यांच्याशी संपर्क होत नसल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
ही तिसरी महिला कोण? नीलिमा चव्हाण सावंत या ब्लॅकमेल करत असल्याने फोन कॉल रेकॉर्ड करण्यासाठी सुधीर मोरे यांनी रेकॉर्ड होणारा मोबाईल फोन विकत घेतला होता. तो मोबाईल फोन देखील पोलिसांनी तपासासाठी हस्तगत केला आहे. सुधीर मोरे यांचे दोन फोन पोलिसांनी जप्त केले आहेत. मोबाईलमधील कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर नीलिमा चव्हाण सावंत आणि सुधीर मोरे यांच्यात तिसऱ्या महिलेची एन्ट्री झाल्याने वाद निर्माण झाले असल्याचे स्पष्ट होत आहे. ही तिसरी महिला कोण याचा पोलीस तपास करणार आहेत. नीलिमा चव्हाण सावंत आणि सुधीर मोरे यांच्यात पैशाचे मोठे व्यवहार काही झाले होते का? याचा देखील रेल्वे पोलीस तपास करणार आहेत. नीलिमा चव्हाण सावंत यांच्या पतीचे निधन झाले. सुधीर मोरे यांच्या पत्नीचे देखील वीस वर्षांपूर्वी निधन झाले आहे.
हेही वाचा-