ETV Bharat / state

Success story Of a Poor Woman : बुरूड समाजातील महिलेची यशकथा, 45 व्या वर्षी मुलीच्या मदतीने अभ्यास करत बारावी उत्तीर्ण - नवीन आदर्श

मुंबई - बांबूपासून तयार करण्यात आलेल्या टोपल्या, सूप, दुरडी या वस्तू तयार करणारा समाज म्हणजे बुरूड समाज ( Burud society ) . हा समाज आजपण मुंबईतील रस्त्यांवर आपला पारंपरिक व्यवसाय करत पोटाची खळगी भरत आहे. या बुरूड समाजातील एका महिलेने तब्बल २५ वर्षाच्या कालावधीनंतर आपल्या मुलीच्या मदतीने बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या आईने परिस्थितीला कंटाळून हार मानणाऱ्यांसमोर एक नवीन आदर्श ( The New Ideal ) ठेवला आहे. गरीबीतून शिक्षण करीत असलेल्या महिलेच्या यशकथेवरील ( Success story of a poor woman ) ईटीव्ही भारताचा हा विशेष रिपोर्ट...

Success story Of a Poor Woman
बुरूड समाजातील महिलेची यशकथा
author img

By

Published : Jun 12, 2022, 10:28 AM IST

Updated : Jun 13, 2022, 1:08 PM IST

मुंबई - बांबूपासून तयार करण्यात आलेल्या टोपल्या, सूप, दुरडी या वस्तू तयार करणारा समाज म्हणजे बुरूड समाज ( Burud society ) . हा समाज आजपण मुंबईतील रस्त्यांवर आपला पारंपरिक व्यवसाय करत पोटाची खळगी भरत आहे. या बुरूड समाजातील एका महिलेने तब्बल २५ वर्षाच्या कालावधीनंतर आपल्या मुलीच्या मदतीने बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या आईने परिस्थितीला कंटाळून हार मानणाऱ्यांसमोर एक नवीन आदर्श ( The New Ideal ) ठेवला आहे. गरीबीतून शिक्षण करीत असलेल्या महिलेच्या यशकथेवरील ( Success story of a poor woman ) ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट...

पुढील शिक्षण घेण्याचे ठरवले - शिक्षणाला वयाचे बंधन नसते असे म्हणतात. यापूर्वी आपण ७० वर्षांच्या वृद्धानेही बोर्डाची परीक्षा दिल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. त्याशिवाय आई व मुलगी एकाच वर्षी बारावी परीक्षा पास झाल्याचेही पाहिले आहे. आता नुकताच बारावीच्या निकाल जाहीर झाला अन् त्यात 25 वर्षांच्या कालावधीनंतर एक आई उत्तीर्ण झाली आहे. या आईचं नाव आहे मोहिनी केशव मोरे. मोरे कुटूंबिय मुंबईतील भेंडी बाजार परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बांबूपासून टोपल्या, सूप, दुरडी या वस्तू तयार करून आपला गाडा हाकत आहे. मच्छिंद्र केशव मोरे यांचे लग्न १९९६ ला औरंगाबादमध्ये राहणाऱ्या मोहिनी यांच्याशी झाले. तेव्हापासून मोहिनी यांना दहावीनंतरचे शिक्षण मध्येच सोडावे लागले होते. मोरे कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने मोहिनीने आपल्या इच्छांना मुरड घालून पुढील शिक्षण थांबविले. आपल्या पतीसोबत बुरूड समाजातील पारंपरिक व्यवसाय करून संसार उभा केला. मोहिनी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोन्ही मुले उच्च शिक्षण घेत आहेत. कोरोना काळात सर्व उद्योग व्यवसाय बंद होते. त्यामुळे मोरे कुटुंबियांची सुद्धा आर्थिक परिस्थिती विस्कटली होती. या दरम्यान मोहिनीने पुढील शिक्षण घेण्याचे ठरवले.

मुलीच्या मदतीने आईने बारावी केली पास - ४५ व्या वर्षी मोहिनीने आपल्या मुलीच्या मदतीने मुंबई सेंट्रल परिसरातील नवनीत महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला.ऑनलाईन वर्गातून शिक्षण घेतले. या दरम्यान दिवसभर घरातील काम करून रात्री १० ते २ वाजेपर्यत नित्यनेमाने अभ्यास केला. अडचण आल्यास मोहिनी यांनी आपल्या मुलीची मदत घेतली. दोन वर्षांनी आज मोहिनी कला शाखेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. मोहिनीने ईटीव्ही भारताला सांगितले की, लग्न झाल्यानंतर संसाराची जबाबदारी माझ्यावर आली. त्यामुळे शिक्षण सोडावे लागले. मात्र, शिक्षण घ्यायचे ही जिद्द मनात कायम होती. शिकण्याची भूक गप्प बसून देत नव्हती. माझ्या पतीने तसेच माझ्या मुलीने मला प्रोत्साहन दिले आणि कोणतीही शिकवणी न लावता घरी अभ्यास करून मी 25 वर्षांनंतर बारावीची परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले आहे.

आत्मविश्वासामुळे शक्य - मोहिनी मोरे यांनी सांगितले की, मला परीक्षेत तीन तासांचा पेपर सोडवायचा होता. त्यामुळे लिखाणाचा खूप सराव केला होता. अनेकदा अभ्यास करताना अडचणीत मला आल्या. मात्र, माझ्या मुलीने मला सांगितले की, मला अभ्यासामध्ये खूप मदत केली. तिने माझ्या अभ्यासातील सर्व अडचणी सोडविल्या. तिच्या सल्ल्यानुसार सराव प्रश्नपत्रिका सोडविल्या. सरावादरम्यान माझा आत्मविश्वास वाढला.

आईच्या यशानंतर मुलगी म्हणाली... - आईच्या यशावर बोलताना मोहिनीची मुलगी नम्रता हिने सांगितले की, जे आईने यश मिळवले आहे ते तिच्या कष्टाचं फळं आहे. आईने घरदार व्यवस्थित सांभाळत मोठ्या कष्टाने यश मिळवलं आहे. याचा मला खूप अभिमान आहे. मुलगी म्हणून मी आईला अनेक विषयात मदत केली. मात्र, शेवटी संपूर्ण प्रयत्न माझ्या आईचे आहेत. मोहिनी मोरे यांचे पती मच्छिंद्र मोरे म्हणाले की, माझ्या पत्नीने जे यश तब्बल 25 वर्षानंतर मिळवले आहे त्याबाबत मला तिचा खूप अभिमान आहे. 1996 मध्ये लग्न झाल्यानंतर घरगुती अडचणींमुळे तिला शिक्षण सोडावं लागलं होतं. मात्र, मला तिची शिक्षणाची ओढ माहीत होती. म्हणून मी तिला 12 वी साठी प्रोत्साहन दिलं.

हेही वाचा - Jammu Kashmir Encounter : पुलवामात तीन दहशतवादी ठार, सुरक्षादलाची मोठी कारवाई

Last Updated : Jun 13, 2022, 1:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.