ETV Bharat / state

मुंबईत १ लाख मतदार अनोळखी; फोटो जमा करा अन्यथा नावे वगळणार - जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा - mumbai collector on voting card

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नावात दुरुस्ती, चुकीचा पत्ता, मतदार कार्डावर ओळखपत्र किंवा चुकीचा ओळखपत्र लागल्यास सुधारणा केली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अचूक मतदार यादी तयार करण्यावर भर दिला आहे.

state election commission
राज्य निवडणूक आयोग
author img

By

Published : Jul 2, 2021, 7:01 AM IST

मुंबई - येथील मतदारांचे पंचनामे करण्यात आले आहेत. यात सुमारे १ लाख १८ हजार मतदार अनोळखी आढळून आले आहेत. संबंधित मतदारांनी आपले फोटो येत्या ८ जुलैपूर्वी मतदार संघात जमा करावीत, अन्यथा त्यांचे नाव वगळण्यात येईल, असा इशारा मुंबईचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर दिला. मतदारांची यामुळे धावपळ उडाली आहे.

१ लाख १८ हजार ओळखपत्र विनाफोटो -

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नावात दुरुस्ती, चुकीचा पत्ता, मतदार कार्डावर ओळखपत्र किंवा चुकीचा ओळखपत्र लागल्यास सुधारणा केली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अचूक मतदार यादी तयार करण्यावर भर दिला आहे. घरोघरी जाऊन मतदारांची माहिती घेण्यात आली. दरम्यान, मुंबईत १ लाख १८ हजार मतदारांच्या ओळखपत्रावर फोटो नसल्याची बाब निदर्शनास आली.

हेही वाचा - कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकल प्रवास खुला करा

काहीही शंका असल्यास संपर्क साधा -

निवडणूक आयोगाने यासाठी मोहीम राबवली. तरीही मतदारांनी याकडे पाठ फिरवली. त्यामुळे www.electionmumbaicity.org.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने फोटो जमा करण्याच्या सूचना आयोगाने केल्या आहेत. मतदारांनी नियोजित वेळेत फोटो जमा न केल्यास मतदार यादीतून नाव वगळण्यात येईल, अशा सूचना मुंबईचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर दिल्या आहेत. तसेच मतदारांना काही शंका असल्यास किंवा या संदर्भात आपल्या काही हरकती किंवा आक्षेप असल्यास आपल्या संबंधीत जवळच्या मतदार संघ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागाने केले आहे.

हेही वाचा - MUMBAI POLICE : आंतरजिल्हा बदलीला 6 महिन्यांसाठी ब्रेक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.