ETV Bharat / state

सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयासाठी स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव सादर करा - मंत्री अमित देशमुख - GT Hospital Independent Medical College Proposal

मुंबईतील सेंट जॉर्ज आणि गोकुळदास तेजपाल (जीटी) या दोन रुग्णालयांसाठी स्वतंत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्याने सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.

GT Hospital Independent Medical College Proposal
जीटी रुग्णालय स्वतंत्र वैद्याकीय महाविद्यालय प्रस्ताव
author img

By

Published : May 8, 2021, 4:38 PM IST

मुंबई - मुंबईतील सेंट जॉर्ज आणि गोकुळदास तेजपाल (जीटी) या दोन रुग्णालयांसाठी स्वतंत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्याने सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले. देशमुख यांनी मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाला भेट देऊन या रुग्णालयात कोविड रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचाराबद्दल माहिती घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री अमित देशमुख यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयाला भेट दिली

हेही वाचा - मुंबईत अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; 40 किलो गांजा जप्त

वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. चंदनवाले, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. माणकेश्वर, सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

रिक्त पदे तातडीने भरा

नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांसोबतच नवीन नर्सिंग कॉलेजचा प्रस्तावही सादर करण्यात यावा, असे सांगून अमित देशमुख यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयात सध्या कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येते, हे लक्षात घेता या रुग्णालयासाठी स्वतंत्र ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यात यावा, कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी अधिकाधिक खाटांची संख्या वाढविण्यात यावी, रुग्णालयातील सर्व रिक्त पदे भरण्याबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्रही तातडीने सुरू करण्यात यावे असे निर्देश दिले.

रुग्णालयात क्रिटीकल केअर युनिट

सेंट जॉर्ज रुग्णालयाचे रुपांतर सध्या कोविड रुग्णालयात करण्यात आले असून क्रिटिकल केअर युनिट म्हणून हे रुग्णालय उपचारासाठी राखून ठेवण्यात आले आहे. असे असले तरीही या रुग्णालयातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे राष्ट्रीय स्तरावरील बरे होणाऱ्या रुग्णांच्या सरासरी पेक्षा कमी असू नये, याची दक्षता घेण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : नोंदणीकृत नसलेल्या घरेलू कामगारांसाठी विशेष व्यवस्था करावी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.