ETV Bharat / state

KBC North Maharashtra University: अबब! विद्यार्थी परिक्षेला हजर मात्र निकालात गैरहजर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रकार - विद्यार्थी परिक्षेला हजर

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील बी. कॉम पदवी परिक्षेसाठी विद्यार्थी हजर असूनही निकालात 80 टक्के विद्यार्थ्यांचे निकाल अनुत्तीर्ण आले आहेत. विद्यार्थ्यांनी निकाल दुरुस्त करण्यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी केली आहे.

KBC North Maharashtra University
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
author img

By

Published : Feb 19, 2023, 9:14 PM IST

विद्यार्थ्यांची निकाल दुरुस्त करण्यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी करताना विद्यार्थी

मुंबई: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अजबच प्रकार समोर आला आहे. उमवीच्या कॉमर्स विषयात परीक्षा दिलेल्या 80 टक्के विद्यार्थ्यांचा निकाल अनुत्तीर्ण लागला. तसेच 80 टक्के विद्यार्थी परीक्षेला हजर असूनही गैरहजर असल्याचे नोंदवले गेले, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. हजारो विद्यार्थ्यांनी या संदर्भात विद्यापीठाकडे याबाबत चौकशीची मागणी केली. तर विद्यापीठ प्रशासनाने याबाबत सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.

काय आहे प्रकार?: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत चार जिल्ह्यातील सुमारे 12,000 पेक्षा अधिक विद्यार्थी हे कॉमर्स या ज्ञान शाखेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्षाचे मिळून उपस्थित आहेत. यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी सेमिस्टर परीक्षेसाठी हजेरी लावण्यात आलेली होती. मात्र, तरी त्यामधून 80 टक्के अनुपस्थित व ज्यांचे निकाल लागले त्यामधून 80 टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे समोर आलेले आहेत. विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या हा निकाल अत्यंत धक्कादायक लागल्याचे वाटत आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया: कॉमर्स या ज्ञान शाखेशिवाय कला आणि विज्ञान यांचा निकाल आद्यपही लागलेला नाही. विद्यार्थ्यांनी सांगितले की, केवळ कॉमर्स या ज्ञान शाखेमध्येच 80 टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण कसे काय असू शकतात. 80 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन सुद्धा त्यांना गैरहजर कसे काय दाखवले, हा आम्हाला महत्त्वाचा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे विद्यापीठाच्या प्रशासनाने यावर तात्काळ आम्हाला दिलासा देणारे उत्तर दिले पाहिजे.

बीकॉमच्या विद्यार्थ्यांचा निकाल: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये बीकॉम या ज्ञान शाखेसाठी प्रथम वर्ष बीकॉमला 4760 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यापैकी केवळ 902 विद्यार्थी पास झाले आणि 3862 म्हणजे 90 टक्के पेक्षा अधिक विद्यार्थी नापास झाले आणि त्यांना एटीकेटी लागलेला आहे. तर बीकॉम मधील दुसऱ्या वर्षाला एकूण प्रवेशित विद्यार्थी 4817 इतके त्यापैकी उत्तीर्ण झाले केवळ 1057आणि नापास झालेले 3760 म्हणजे 80 टक्के पेक्षा अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. तर बीकॉम मधील तृतीय वर्ष बीकॉममध्ये प्रवेशित विद्यार्थी 3985 आणि त्यापैकी केवळ उत्तीर्ण झाले 726 विद्यार्थी आणि अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांची संख्या 3259 इतकी आहे.

असा लागला निकाल: बीकॉमच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय तीनही वर्ष मिळून 12 हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामध्ये जे रिपीटर आहे त्यांनी देखील परीक्षा दिली आहे. रिपीटरकरिता एकूण प्रथम वर्ष बीकॉममध्ये विद्यार्थी 2929 इतके होते. त्यापैकी उत्तीर्ण केवळ 1085 विद्यार्थी आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 1084 आहेत. तर द्वितीय वर्ष बीकॉममध्ये रिपीटर असलेले विद्यार्थी 1459 तर उत्तीर्ण केवळ 604 इतके विद्यार्थी तर अनुत्तीर्ण विद्यार्थी 855 इतकी आहेत. रिपीटर मधील तृतीय वर्ष बीकॉम साठी प्रवेशित विद्यार्थी 703 आणि त्यापैकी उत्तीर्ण केवळ 220 या आणि एटीकेटी लागलेले अनुत्तीर्ण विद्यार्थी 461 इतके आहेत.

विद्यार्थी संघटनांचा सवाल: यासंदर्भात त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणारे महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे रोहन महाजन यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद सांगितले की, नुकताच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांचा कॉमर्स या शाखेतील निकाल लागलेला आहे. यामध्ये 80 टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले समजले. विद्यार्थ्यांनी याबाबत सांगितले की आम्ही परीक्षेला हजर होतो. तरी गैरहजर म्हणून नमूद केले आहे. आणि आम्ही पूर्ण पेपर लिहिलेला आहे आणि तरी आम्हाला शून्य मार्क दिले गेले. त्यामुळे विद्यापीठाने यावर चौकशी करून विद्यार्थ्यांना नेमके काय ते सांगावे. पूर्ण पेपर लिहिलेला असताना शून्य मार्क कसे काय मिळू शकतात? हा मूलभूत प्रश्न आहे, याचे विद्यापीठ प्रशासनाने उत्तर देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

विद्यापीठ प्रशासनाची भूमिका: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परीक्षा नियंत्रक मंडळाचे प्रमुख दीपक दलाल यांनी ईटीव्ही भारत सोबत या संदर्भात खुलासा केलेला आहे. ते म्हणाले की, विद्यार्थी म्हणतात तसे नाही. आम्ही आतापर्यंत परीक्षा दिलेल्या 2200 विद्यार्थ्यांपैकी 100 उत्तर पत्रिका तपासल्या. त्यामध्ये अद्यापही विद्यार्थी म्हणतात तशा काही बाबी आढळलेल्या नाही. मात्र यासंदर्भात संपूर्ण चौकशी करण्यासाठी आम्हाला आठ दिवसाचा कालावधी लागेल. त्यानंतरच यासंदर्भात निष्पक्षपणे वस्तुस्थिती समोर येऊ शकेल. तसेच यासंदर्भात विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क केलास त्यांचे गाऱ्हाणे समजून घेऊन जे काही तांत्रिक दोष किंवा काही कमी जास्त असेल तर तो विद्यापीठाच्या वतीने दूर केले जाईल, असे देखील त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे नुकसान होईल असे कोणतेही काम विद्यापीठ प्रशासन करणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

हेही वाचा: Uddhav thackeray on Amit Shah : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर 'मोगॅम्बो खूश हुआ', उद्धव ठाकरेंची खोचक टीका, तर शाह म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.