मुंबई - कोणतेही सिनेमागृह चालू असेल तर कारवाई केली जाईल. आम्ही लिखित आदेश दिले नसले तरी काल जे काही बोललो ते आमचे आदेश आहेत. आदेश न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
विषाणू तपासणी केंद्राची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागते. कोरोना संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे गर्दी टाळणे महत्वाचे आहे. आपण आवश्यक ती दक्षता घेत आहोत. उपचार करण्यापेक्षा काळजी घेणे चांगले. काही गोष्टी आपण स्वतःहून पाळायला पाहिजे. घाबरण्याचे कारण नाही. कुठेही गर्दी होऊ नये यासाठी आम्ही शाळा, सिनेमागृहे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. किराणा दुकाने वगळून बाकी सर्व मॉल बंद ठेवण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
जिथे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळत आहेत, ते तीव्र नाही. तसेच लक्षणे वाढलेले देखील नाहीत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही ठिकाणी व्हेंटीलेटर कमी पडले आहेत. त्यामुळे आमची नवीन व्हेंटीलेटर घेण्याची तयारी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.