ETV Bharat / state

Stone Throwing At AC Local : मध्य रेल्वेच्या एसी लोकलवर 30 दगडफेकीच्या घटना; काचा फुटल्याने रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान

author img

By

Published : Mar 28, 2022, 8:51 PM IST

मध्य रेल्वेवर एसी लोकल ट्रेनची ( AC Train Increase ) संख्या नुकतीच वाढविण्यात आहे. मात्र एसी लोकल सर्वसामान्यांना परवडणारी नसल्याने एसी लोकलबाबत प्रवाशांमध्ये नाराजी ( Dissatisfaction Among Passengers On AC Train ) दिसून येत आहे. तसेच अनेक ठिकाणी दगडफेकीच्याही घटनाही घडल्या आहेत.

Stone Throwing At AC Local
Stone Throwing At AC Local

मुंबई - मध्य रेल्वेवर एसी लोकल ट्रेनची ( AC Train Increase ) संख्या नुकतीच वाढविण्यात आहे. मात्र एसी लोकल सर्वसामान्यांना परवडणारी नसल्याने एसी लोकलबाबत प्रवाशांमध्ये नाराजी ( Dissatisfaction Among Passengers On AC Train ) दिसून येत आहे. मध्य रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकलवर 30 वेळा दगडफेक झाल्याचा घटना घडलेल्या आहे. तर पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलवर दगडफेकीचा फक्त दोन घटना नोंदविण्यात आलेल्या आहे. यामध्ये ट्रेनच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याने रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

हार्बर मार्गावर सर्वाधिक दगडफेकीच्या घटना - पश्चिम रेल्वेनंतर मध्य रेल्वेने आपल्या मार्गावर एसी लोकल चालवण्याची सुरुवात केली आहे. सर्वप्रथम मध्य रेल्वेने 30 जानेवारी 2020 पासून ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान पहिली एसी लोकल सुरू केली होती. त्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर 17 डिसेंबर 2020 पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मार्गावर दुसरी एसी लोकल चालविण्यात आली आहे. आता आणखी मध्य रेल्वेचे मुख्य मार्गावर 34 एसी लोकल फेऱ्यांची भर पडल्याने वातानुकूलित लोकल ट्रेनची संख्या दहावरून 44 वर पोहोचली आहे. मात्र, एसी लोकलचे भाडे जास्त असल्यामुळे प्रवाशांमध्ये आजही नाराजी आहे. वर्षभरापासून एसी लोकलचे तिकीट दर कमी करा अन्यथा एसी लोकल बंद करा, अशी मागणी प्रवासी आणि प्रवासी संघटनेकडून होत आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून अद्यापही याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नसून उलट एसी लोकल फेऱ्या वाढविण्यात येत आहे. परिणामी गेल्या 14 महिन्यात एसी लोकलवर 30 वेळा दगडफेक झाल्याचा घटना घडलेल्या आहे. यामध्ये ट्रेनच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याने रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हार्बर मार्गावर एसी लोकलवर सर्वाधिक दगडफेकीच्या घटना घडल्या आहे.

प्रत्येकी काच दहा हजार रुपयांचा - मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 14 महिन्यात दगडफेकीच्या 30 घटनांची नोंद झाली आहे. यापैकी 18 घटना गेल्या पाच महिन्यात घडलेल्या आहे. हार्बर मार्गावरील एसी लोकलवर दगफेकीच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. विशेषता चेंबूर ते मानखुर्द दरम्यानच्या रुळांशेजारील झोपडपट्यामधून एसी लोकलवर दगड मारल्या जात आहे. दगडामुळे खिडकीची काच तुटले असून तुटलेल्या काचा बदलण्यात येत आहे. एसी लोकलच्या एका काचेची किंमत सुमारे 10 हजार रुपये आहेत.

दगडफेकणाऱ्या विरोधात कारवाई - पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात पश्‍चिम रेल्वेवरील एसी लोकलवर दगडफेकीचा फक्त दोन घटना घडलेल्या आहे. याशिवाय दगडफेकणाऱ्या विरोधात रेल्वेने कारवाई सुद्धा केलेली आहे. आतापर्यंत काही जणांना अटक करून त्यांच्याकडून दंड वसूल केलेला आहे. आम्ही नागरिकांना आवाहन करतो की रेल्वेची संपत्ती ही आपली संपत्ती आहे, म्हणून नागरिकांनी एसी लोकल वर दगडफेक करू नये.

हेही वाचा - Chandrakant Patil Criticized CM : भाग्यवान माणूस जन्माला आला; चंद्रकांत पाटलांनी वाचली मुख्यमंत्री ठाकरेंची कुंडली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.