ETV Bharat / state

Guardian Minister Appointment Issue : आता तात्पुरत्या पालकमंत्री पदाचाही वाद; हंगामी पालकमंत्री ठरवून ध्वजारोहण उरकण्याचे धोरण - Guardian Minister Appointment Issue

ट्रिपल इंजिन सरकारमध्ये आता वेगवान काम होण्याचा दावा एकीकडे राज्यसरकार करीत असताना दुसरीकडे ज्येष्ठतेचा वाद रंगू लागल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे महत्त्वाची खाती गेल्यामुळे शिंदे गटाचे आणि भाजपचे आमदार नाराज झाले आहेत. त्यातच आता जिल्ह्यांच्या तात्पुरत्या पालकमंत्री पदाचा वादही चव्हाट्यावर आला आहे. 15 ऑगस्टला त्या-त्या जिल्ह्यातील पालकमंत्री ध्वजारोहण करतात. मात्र, काही जिल्ह्यांना पालकमंत्रीच नसल्याने तात्पुरते पालकमंत्री ठरवून ध्वजारोहण उरकण्याचे धोरण सरकारने आखले आहे.

Guardian Minister Appointing Issue
मंत्रालय
author img

By

Published : Aug 11, 2023, 6:51 PM IST

मुंबई : राज्य सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी आशा अनेक इच्छुक आणि ज्येष्ठ आमदारांना लागून राहिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे गाजर सातत्याने आमदारांना देत आहेत. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने पालकमंत्रीपदाचा तिढाही निर्माण झाला आहे. संबंधित जिल्ह्यातील ज्येष्ठ मंत्र्यांनी पालकमंत्रीपदाचा दावा केला असल्याने आता तिन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या पालकमंत्रीपदाच्या हट्टाचा नवा वाद रंगू लागला आहे. सरकारने स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणासाठी तात्पुरत्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, यामुळेसुद्धा नवा वाद निर्माण झाला आहे.

'हे' पाच जिल्हे वादात : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सध्या भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. मात्र, या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हवे आहे. जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन आग्रही आहेत. तेथे गुलाबराव पाटील पालकमंत्री आहेत. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी छगन भुजबळ आग्रही असताना नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आले आहे. तर दादा भुसे हेसुद्धा नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी स्पर्धेत आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्यांच्याकडे ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र कोल्हापुरात ध्वजारोहणाकरता जाण्यासाठी पवार इच्छुक नाहीत. कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी हसन मुश्रीफ इच्छुक आहेत; मात्र त्यांना सोलापूरची जबाबदारी देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आदिती तटकरे यांना हवी आहे; मात्र तटकरे यांना गोगावले आणि महेंद्र दळवी तसेच अन्य आमदारांचा विरोध असल्याने सध्या तरी रायगडच्या ध्वजारोहणाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. परंतु हा महत्त्वाचा जिल्हा पाहता या जिल्ह्यातील ध्वजारोहणाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याच्या ध्वजारोहणाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री येथे करणार ध्वजारोहण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई येथे ध्वजारोहण करतील. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथे आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे ध्वजारोहण करणार आहेत.

ध्वजारोहणासाठी पालकमंत्र्यांची नावे : देवेंद्र फडणवीस नागपूर, अजित पवार कोल्हापूर, छगन भुजबळ अमरावती, सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर, चंद्रकांत पाटील पुणे, दिलीप वळसे पाटील वाशिम, राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर, गिरीश महाजन नाशिक, दादा भुसे धुळे, गुलाबराव पाटील जळगाव, रवींद्र चव्हाण ठाणे, दीपक केसरकर सिंधुदुर्ग, उदय सामंत रत्नागिरी, अतुल सावे परभणी, संदिपान भुमरे औरंगाबाद, सुरेश खाडे सांगली, विजयकुमार गावित नंदुरबार, तानाजी सावंत उस्मानाबाद, शंभूराज देसाई सातारा, अब्दुल सत्तार जालना, संजय राठोड यवतमाळ, धनंजय मुंडे बीड, धर्मराव आत्राम गडचिरोली, संजय बनसोडे लातूर, अनिल पाटील बुलडाणा, अदिती तटकरे पालघर असे ध्वजारोहणाच्या जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. तर सध्याच्या यादीनुसार रायगड, गोंदिया, वर्धा, हिंगोली, भंडारा, अकोला आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

हेही वाचा:

  1. Sunil Tatkare On CM : मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांच्यात कोल्ड वॉर? सुनील तटकरेंनी दिले 'हे' स्पष्टीकरण
  2. Rahul Gandhi : 'मोदींना मणिपूर जाळायचे आहे, सैन्याने मनात आणले तर..', राहुल गांधींचा गंभीर आरोप
  3. Raghav Chadha : आप खासदार राघव चढ्ढा आणि संजय सिंह राज्यसभेतून निलंबित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.