मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ टर्मिनस-1 येथून वातानुकूलित शिवनेरी आणि शिवशाही बससेवा 16 डिसेंबरपासून पुणे आणि दापोलीसाठी सुरू होणार आहे. एस. टी. महामंडळाने प्रवाशांच्या सोईसाठी हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - गोव्याला आंतरराष्ट्रीय कौशल्य केंद्र म्हणून विकसित करणार - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
शिवनेरी बसच्या बोरिवली-स्वारगेट 17 फेऱ्या आणि शिवशाही बसच्या बोरिवली-दापोली 3 फेऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी विमानतळाजवळून सुरू होत आहेत. प्रवाशांच्या माहितीसाठी सांताक्रूझ छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ टर्मिनस- 1 येथे गाड्यांच्या वेळापत्रकांचा फलक लावण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाचा अधिकृत बोधचिन्ह असलेला फलक, महामंडळाची वेबसाईट आणि टोल फ्री क्रमांक असलेला हा फलक आहे.
हेही वाचा - कडकनाथ कोंबडी घोटाळा : शेतकऱ्यांचे आझाद मैदानात आंदोलन, आरोपींची संपत्ती विकून नुकसान भरपाईची मागणी
ज्या ठिकाणी राज्य परिवहन बस चढण्यासाठी-उतारण्यासाठी थांबणार आहेत, त्या ठिकाणी प्रवाशांच्या माहितीसाठी प्रवाशी थांब्याचा फलक लावण्यात आला आहे. प्रवाशांना माहिती देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी दोन सत्रामध्ये वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करण्यात आली आहे.
बोरिवली नियंत्रण कक्ष दूरध्वनी ०२२-२८९३१२२६/०२२-२८९७२३४८ ; ऑनलाईन तिकीट बुकिंग msrtc.maharashtra.gov.in ; टोल फ्री दूरध्वनी क्रमांक- १८००२२१२५० असा आहे. ही माहिती प्रवाशांच्या सोईसाठी एसटी प्रशासनाने दिली आहे.
बसचे वेळापत्रक खालीलप्रमाणे -
शिवनेरी एसी बस बोरिवली-स्वारगेट, सांताक्रूझ टर्मिनस- 1 (domestic) येथून सुटण्याच्या वेळा , 5.30, 6.30 , 7.30 , 8.30, 9.45 , 10.44, 11.45, 12.45, 13.45, 14.45, 15.44, 16.45, 17.45, 18.45, 19.45, 20.45, 21. 45
शिवशाही (वातानुकूलित) बस बोरिवली-दापोली, सांताक्रूझ टर्मिनस- 1 (domestic) येथून सुटण्याच्या वेळा 7.30 , 21.45, 23. 30