ETV Bharat / state

Honor Of ST Driver : 25 वर्षे विना अपघात सेवा केलेल्या एसटी चालकांना मिळणार 25 हजाराचा धनादेश

एसटी महामंडळातर्फे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपल्या सेवेमध्ये सलग २५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी विना अपघात सेवा बजावणाऱ्या राज्यभरातील एसटीच्या ७८० चालकांचा सपत्नीक सन्मान केला जाणार आहे. यावेळी त्यांना 25 हजाराचा धनादेशी देण्यात येणार आहे.(ST Corporation)

Honor Of ST Driver
एसटी चालकांचा सन्मान
author img

By

Published : Jan 25, 2023, 7:33 PM IST

मुंबई: महाराष्ट्रातील एसटी ही ग्रामिण आणि शहरी भागांना जाेडणारी लाईफलाईन आहे असे मानले जाते. एसटी महामंडळात २५ वर्ष विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त सन्मान केला जाणार आहे. या वेळी अशा चालकांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, बिल्ला यासह पत्नीला साडी व रोख २५ हजाराचा धनादेश देण्यात येणार आहे. राज्यभरातील प्रत्येक विभागीय कार्यालयामध्ये विभाग नियंत्रक यांच्या हस्ते व मुख्यालयात उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या हस्ते या चालकांचा सत्कार होणार आहे.

सद्यस्थितीत एसटी महामंडळाकडे २४ हजार ३८९ चालक कार्यरत आहेत. अशा गौरव समारंभाच्या माध्यमातून विना अपघात सेवा करण्याऱ्या चालकांचा सत्कार हा इतर चालकांना प्रेरणादायी ठरणार आहे. तसेच भविष्यात अपघात विरहीत सेवा देणाऱ्या चालकांची संख्या वाढून प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी सर्व चालकांनी घ्यावी अशी अपेक्षा उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी व्यक्त केली आहे.

एसटी कामगारांनी कर्मचाऱ्यांनी संप केला संपातून त्यांना मिळाले काय असा सवाल निर्माण होतो. त्याचे कारण विलीनीकरण झालंच नाही मात्र एसटी कामगारांचा आता वेतनाच्या बाबत झालेला असंतोष अनेक प्रलंबित मागण्या त्याच्यावर फुंकर घालण्यासाठी म्हणून पंचवीस वर्षे ज्या बस चालवायला ज्यांना झाली अशा चालकांचा गौरव शासन करीत असल्याचे एसटी कामगार काँग्रेसचे नेते श्रीरंग बर्गे यांनी सांगितले. २५ वर्ष व त्यापेक्षा जास्त काळ विना अपघात सेवा केलेल्या चालकांची विभागनिहाय माहिती

विभागकर्मचारी
औरंगाबाद १५१
मुंबई ८४
नागपूर ६९
पुणे १९७
नाशिक ८९
अमरावती १८६

एसचटी महामंडळात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न मोठे आहेत. त्याना आपल्या मागण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. गेल्या काही वर्षात एसटी कर्मचाऱ्यांनी सातत्याने संघर्ष करत मागण्या शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्या प्रमाणात अद्याप मोबदला मिळत नाही. एसटी सातत्याने तोट्यात चालत आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाय योजना होताना दिसत नाहीत. यातच एसटीचा बराच पैसा शासनाकडे सातत्याने अडकलेला असतो त्या मुळे पगारासाठीही एसटीला शासनाच्या निधिवर अवलंबुन रहावे लागते हे पहायला मिळत आले आहे.

हेही वाचा : Republic Day High Alert : प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट, मुंबई पोलीस सतर्क

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.