ETV Bharat / state

'लालपरी'ने 3 दिवसांत 21 हजार मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत पोहचवले - st buses

भर उन्हात पायपीट करीत चाललेल्या या हजारो मजुरांना बसेसमध्ये सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करीत राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात येत आहे.

st-buses-dropped-laborers-to-the-borders-of-their-states
लालपरीने 3 दिवसांत 21 हजार मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत पोहचवले
author img

By

Published : May 12, 2020, 10:47 AM IST

मुंबई - लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांचा गाव जवळ करण्यासाठी पायी प्रवास चालू आहे. ही बाब लक्षात घेऊन या मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत बसने पोहचवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. या निर्देशानुसार एसटी महामंडळाने गेल्या तीन दिवसांत विविध आगारातील तब्बल 1169 बसेसद्वारे सुमारे 21 हजार 714 मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गाडीमध्ये बसवून सुखरूप राज्यांच्या सीमेपर्यंत पोहोचविले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

11 मे या एका दिवसात ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर अशा विविध विभागातील 530 एसटी बसेस द्वारे हमरस्त्यावरुन अत्यंत धोकादायक पद्धतीने पायपीट करित चाललेल्या 11 हजार 866 मजुरांना गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व कर्नाटकातील सीमेपर्यंत जाऊन सोडण्यात आले. अशा प्रकारे गेल्या तीन दिवसांत 21 हजार 714 मजूरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचविण्यात एसटी प्रशासन यशस्वी झाले आहे.

भर उन्हात पायपीट करीत चाललेल्या या हजारो मजुरांना बसेसमध्ये सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करीत राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात एसटी कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावत आहेत. त्यामुळे हे सर्व कर्मचारी कौतुकास पात्र आहेत, असे गौरवोद्गार परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांबद्दल काढले आहेत.

या बरोबर काही ठिकाणी आवश्यकतेनुसार श्रमिकांना पिण्याचे पाणी व जेवणाची व्यवस्था देखील एसटी महामंडळाकडून करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.