राज्यपाल पुढे म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थित राहताना मला विशेष आनंद होत आहे. तसेच त्यांनी यावर्षीचे शिव छत्रपती जीवन गौरव पुरस्कार विजेते मल्लखांब व योग प्रसारक उदय देशपांडे यांचे यावेळी कौतुक केले.
मल्लखांबसाठी योगदान देणाऱ्या उदय देशपांडे यांना सन २०१७-१८ यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर साहसी क्रीडा पुरस्कार प्रियांका मोहितेंना देण्यात आला.
या कार्यक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले की, आमच्या सरकारच्या काळात खेळाडूंना मैदानाकडे आकर्षित केले. खेळाडूंचे मार्क वाढवून दिले. खेळाडूंना नोकरीत आरक्षण आणि थेट नियुक्त्यांचे धोरण स्विकारले असल्याचे तावडे यांनी सांगितले.
लाभार्थ्यांनी थेट नियुक्तीसाठी खेळाडूंनी क्रीडा खात्याचा आग्रह धरावा. एका पुरस्कारासाठीही निवड समितीकडे फोन केला नाही. आम्ही कीडा, सांस्कृतिक कार्यक्रमात राजकारण करणार नाही असे तावडे म्हणाले.
तावडे पुढे बोलताना म्हणाले की , क्रीडा विभाग स्वत: खेडाळूंची माहिती संकलित करण्याचे काम करणार आहे. साहसी क्रीडा प्रकारातील चुका दुरुस्ती केल्याचे तावडे यांनी सांगितले.