मुंबई: बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाच्या अधिकारांतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी राबवण्यात येणार्या प्रवेश प्रक्रियेला १७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली.आरटीई प्रवेशासाठी संपूर्ण राज्यातून ८ हजार ६१४ शाळांमध्ये ९५ हजार ५३७ जागा आहेत. मात्र अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच राज्यभरातून आरटीई प्रवेशासाठी तब्बल ३० हजार ८८४ अर्ज आले. आरटीई अंतर्गत असलेल्या जागांच्या तुलनेत अधिक अर्ज फक्त नागपूर जिल्हात आले आहे. नागपूरमध्ये ६ हजार १८६ जागेसाठी अवघ्या तीन दिवसात ९ हजार ३८१ अर्ज आले आहे. त्यामुळे नागपुरात आरटीई प्रवेशासाठी आतापासून स्पर्धा दिसून येत आहे.
![RTE Admission](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-rte-admission-in-nagpur-mumbai-7209757_19022022162933_1902f_1645268373_718.jpg)
जिल्हा अर्ज
नागपूर- ९३८१
मुंबई- ३४३४
औरंगाबाद- ३०६८
जळगाव - १९०३
अमरावतीत- १९९४
९५ हजार ५३७ जागा
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, प्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे खासगी शाळांमधील २५ टक्के जागांवर आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश मिळत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील पालकांचे लक्ष आरटीई प्रवेश प्रक्रियेकडे लागलेले असते. यंदा आरटीई प्रवेशासाठी राज्यभरातील ८ हजार ६१४ शाळांमध्ये ९५ हजार ५३७ जागा आहेत. गेल्या २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षांकरिता आरटीई प्रवेशासाठी राज्यभरातून ९३ हजार८०२ जागांसाठी २ लाख २२ हजार ५८४ अर्ज आले होते.