ETV Bharat / state

महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज बुलंद करणाऱ्या 'या' दिग्गज नेत्यांची भासणार उणीव - विधानसभा निवडणूक

महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज बुलंद करणारे असे काही नेते होते जे आजही राज्याच्या स्मरणात आहेत. कोणीही डोळे झाकून निवडून येणार, असे सांगू शकणारे हे नेते म्हणजे काँग्रेसचे पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे आर आर पाटील तसेच भाजपचे पांडुरंग फुंडकर. मात्र, या नेत्यांच्या निधनानंतर ही विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे त्यांची उणिव राज्याला भासणार आहे.

विधानसभा
author img

By

Published : Sep 24, 2019, 11:11 AM IST

Updated : Sep 24, 2019, 11:47 AM IST

मुंबई - राज्याच्या विधानसभा निवडणुकांसाठी तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. आरोप प्रत्यारोपाने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज बुलंद करणारे असे काही नेते होते जे आजही राज्याच्या स्मरणात आहेत. कोणीही डोळे झाकून निवडून येणार, असे सांगू शकणारे हे नेते म्हणजे काँग्रेसचे पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे आर आर पाटील तसेच भाजपचे पांडुरंग फुंडकर. मात्र, या नेत्यांच्या निधनानंतर ही विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे त्यांची उणिव राज्याला भासणार आहे.

हेही वाचा - सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीची तारीख जाहीर, निवडणूक आयोगाची घोषणा

पतंगराव कदम -

राज्याच्या राजकारणातील एक हजरजबाबी व दिलखुलास व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांचे 9 मार्च 2018 रोजी प्रदीर्घ अश्या रक्ताच्या कर्करोगाने त्यांचे लीलावती रुग्णालयात निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील राजकारणाचा एक व्यापक पट पाहिलेला व त्या पटावर अनेक खेळी खेळलेला एक मुरब्बी राजकारणी म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख होती.

हेही वाचा - आता चर्चेची नाही तर कृतीची गरज, भारतात जलजीवन मिशनची सुरुवात - पंतप्रधान मोदी

महाराष्ट्राच्या राजकारणात पतंगराव यांची 'वजनदार' नेता अशी ओळख होती. राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या सांगली जिल्ह्यात त्यांनी काँग्रेसचा जनाधार कायम राखला. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतरही सांगलीसारख्या त्यांच्या बालेकिल्ल्यात त्यांनी कधीही काँग्रेस पक्ष सोडला नाही. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी शिक्षण, वन, मदत व भूकंप पुनर्वसन, उद्योग, महसूल अशा विविध खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे पेलली. मुख्य म्हणजे काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात जेव्हा जेव्हा नेतृत्वबदलाच्या हालचाली झाल्या त्या प्रत्येकवेळी पतंगराव यांचे नाव चर्चेत राहिले मात्र, अशी संधी मात्र या नेत्याला मिळू शकली नाही.

आर आर पाटील (आबा)-

महाराष्ट्रात लेडिज बारचा नंगानाच बंद करण्याचा धाडसी निर्णय घेणारे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादीचे नेते आणि सर्वांचे 'आबा' आर. आर. पाटील यांचे कॅन्सरच्या आजारामुळे 16 फेब्रुवारी 2015 रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. त्यावेळी ते ५७ वर्षांचे होते. अजातशत्रू आबांच्या निधनाने महाराष्ट्राने एक तळागाळातून आलेला संवेदनशील मनाचा नेता गमावल्याची भावना आजही व्यक्त होत आहे. आबा नाही हे पचवायला बराच काळ लागेल अशी निशब्ध प्रतिक्रिया शरद पवार यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.

राजकीय पार्श्वभूमी

बी.ए. आणि एल.एल.बी चं शिक्षण घेतलेले आर.आर. पाटील सांगली जिल्हा परिषदेचे १९७९ ते १९९० या काळात सदस्य होते. अतिशय सामान्य घरातून आलेले आबा पहिल्यांदा २००४ ला उपमुख्यमंत्री झाले. तासगाव मतदारसंघातून ते १९९०, १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१५ ला निवडून आले. मुंबईत नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर २००९ मध्ये ते पुन्हा गृहमंत्री झाले. आघाडी सरकारच्या काळात ते नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते.

पांडुरंग फुंडकर -

विदर्भातील भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने मुंबईत निधन झाले. त्यावेळी ते ६७ वर्षांचे होते. एकेकाळी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक असलेले फुंडकर यांचे ग्रामीण भागात बहुजन समाजात मोठे काम होते. मितभाषी असलेले फुंडकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पद, लोकसभेतील अकोल्याचे तीनदा प्रतिनिधित्व केले होते. लोकसभा, विधानसभा आणि राज्यसभा अशा तीनही सदनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फुंडकर यांनी भाजपचा जनाधार वाढवण्यासाठी नेटाने काम केले होते.

हनुमंतराव डोळस -

माळशिरस विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार हनुमंतराव डोळस यांचे दीर्घ आजाराने निधन झालं. त्यावेळी ते 57 वर्षांचे होते. हनुमंतराव डोळस हे माळशिरस तालुक्यातील दसूर गावचे रहिवाशी होते. 2009 पासून माळशिरस मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्यापासून, डोळस या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत होते.

हेही वाचा - २५ वर्षांपासून पिंपळखुटा गावाची वाट बिकट; आमदारांचे 'चैनसुख' उडवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

कोण होते हनुमंतराव डोळस?

हनुमंतराव डोळस हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार होते.

पहिल्यांदा 2009 मध्ये विधानसभेवर निवडून गेले, 2014 मध्येही राष्ट्रवादीकडूनच आमदार

चर्मकार महामंडळाचं अध्यक्षपदही सांभाळलं

विजयसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख

2009 मध्ये माळशिरस मतदारसंघ राखीव झाल्यानंतर मोहिते पाटलांकडूनच डोळस यांना उमेदवारी

30 एप्रिल 2019 रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली

कृष्णा घोडा -

पालघर येथील शिवसेना आमदार कृष्णा अर्जुन घोडा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. घोडा हे त्यावेळी ६१ वर्षाचे होते. घोडा हे चारवेळा विधानसभेवर निवडून आले होते.

गोविंदराव राठोड -

गोविंदराव राठोड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. ते मूळचे काँग्रेसचे होते. नांदेड जिल्हा परिषदेत त्यांनी काँग्रेसच्यावतीने सदस्यत्व व सभापतीपद भूषविले. २००९च्या विधानसभा निवडणुकीत राठोड यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण, त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. पुढे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर त्यांनी मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली होती.

Intro:Body:

Conclusion:
Last Updated : Sep 24, 2019, 11:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.