ETV Bharat / state

Sonu Nigam News: सोनू निगम प्रकरणातील आरोपीच्या बहिणीची प्रतिक्रिया

चेंबूरमध्ये लाइव्ह म्यूझिक कार्यक्रमादरम्यान काही लोकांनी सोनू निगमवर हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली होती. सोनू निगम कार्यक्रमासाठी आला असताना त्याला धक्काबुक्की झाल्याचा व्हिडिओ वाऱ्यासारखा वायरल झाला. या पार्श्वभूमीवर प्रकाश फातर्पेकर यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुप्रदा फातर्पेकर यांनी घडलेला घटनाक्रम ट्विटरवर सांगितला आहे.

suprada fatarpekar
सुप्रदा फातर्पेकर
author img

By

Published : Feb 21, 2023, 4:19 PM IST

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांचे पुत्र स्वप्नील फातर्पेकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांवर सोनू निगमला धक्काबुक्की करण्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर सुप्रदा फातर्पेकर यांनी घडलेला घटनाक्रम ट्विटरवर सांगितला आहे. या प्रकरणावरून वाद सुरू झाला. आता या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यासंदर्भात प्रकाश फातर्पेकर यांच्या कन्या सुप्रदा फातर्पेकर यांनी स्पष्टीकरणा दाखल ट्वीट केले आहेत. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी सोनू निगम यांची माफीही मागितल्याचे स्पष्ट केले आहे.

गर्दीमुळे थोडा गोंधळ उडाला: चेंबूरमधील कार्यक्रमाची आयोजक म्हणून तेव्हा नेमके काय घडले, याविषयी सत्य समोर मांडण्याची माझी इच्छा आहे. तो एक दुर्दैवी प्रकार होता. सोनू निगम कार्यक्रमानंतर स्टेजवरून खाली येत असताना माझा भाऊ त्यांच्यासह सेल्फी काढण्याच्या प्रयत्न करत होता. पण तिथल्या गर्दीमुळे थोडा गोंधळ उडाला. या प्रयत्नात खाली पडलेल्या व्यक्तीला झेन रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांना सोडण्यात आले आहे. असे फातर्पेकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

गायक सोनू निगमसोबत वाद : गायकाच्या मॅनेजरला हल्लेखोराने स्टेजवरून उतरण्यास सांगितले. सोनू येत असताना त्याला धक्काबुक्की केली. मिळालेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीने सोनूच्या मित्रालाही धक्काबुक्की केली होती. दोघांना दुखापत झाली होती. नंतर इंटरनेट मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये एक व्यक्ती सोनू आणि त्याच्या मित्राला ढकलताना दिसत आहे. या घटनेनंतर सोनू निगमने एफआयआर दाखल केला होता. मुंबईतील एका कार्यक्रमात सेल्फी घेण्यावरून बॉलिवूड गायक सोनू निगमसोबत वाद झाल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले होते.

चाहत्यांनी मारहाण केली : एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, निगम एका संगीत महोत्सवात सहभागी होण्यासाठी चेंबूरच्या उपनगरात असताना रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली होती. कार्यक्रम स्थळावरून बाहेर पडत असताना, चाहत्यांचा एक गट सेल्फीसाठी गायकाकडे आला तेव्हा त्याच्या दोन सहकाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर, सोनू निगमच्या दोन्ही साथीदारांना चाहत्यांनी मारहाण केली, परिणामी त्यांच्यापैकी एक किरकोळ जखमी झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. सोनू निगमचा मित्र रब्बानी मुस्तफा खान याला अधिक दुखापत झाली आहे. खानला रुग्णालयात नेले तेव्हा सोनू निगमही त्याच्यासोबत होता. यानंतर सोनू निगम आपला जबाब नोंदवण्यासाठी पोलिसात पोहोचला.

गैरवर्तन करून उद्धटपणे बोलल्याचा आरोप : अधिक जखमी रब्बानी हा दिवंगत उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचा मुलगा असून ते सोनू निगमचे गुरू होते. रब्बानी आणि सोनू खूप जवळचे मित्र असल्याचे सांगितले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे कॅम्पचे आमदार प्रकाश फाटर्पेकर यांच्या मुलाने त्याच्या साथीदारांसह सोनू निगम आणि खान यांच्यावर हल्ला केला. सोनू निगम मंचावर सादरीकरण करत असताना आमदार प्रकाश फाटर्पेकर यांच्या मुलाने सोनूचा व्यवस्थापक साईराज यांच्याशी गैरवर्तन करून उद्धटपणे बोलल्याचा आरोप केला.

सेल्फी घेण्याचा प्रयत्न : कार्यक्रमानंतर सोनू मंचावरून खाली उतरत असताना आमदार मुलाने घाईघाईने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान सोनूचा अंगरक्षक हरी याने त्याला शिष्टाचारासह सेल्फी घेण्यास सांगितले. आमदार मुलाने संतापून हरीला धक्काबुक्की केली. यादरम्यान त्याने सोनू निगमलाही धक्काबुक्की केली. बॉडी गार्ड हरीने लगेच सोनूला पकडून त्याला पडण्यापासून वाचवले. यानंतर आमदाराच्या मुलाने रब्बानी मुस्तफा खान यांना धक्काबुक्की केल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या सोनू निगमने या मुद्द्यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. सोनू निगमने काही वर्षांपूर्वी अजानबाबत केलेल्या वक्तव्याशी या प्रकरणाचा काहीही संबंध नसल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: Sonu Nigam News चेंबूरमध्ये कार्यक्रमादरम्यान सोनू निगमला आमदार पुत्राकडून मारहाण गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.