ETV Bharat / state

थोडक्यात महत्त्वाचे : महाराष्ट्रातील घडामोडी - some important news from maharashtra

राज्यातील संपूर्ण महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात...

some important news from maharashtra
थोडक्यात महत्त्वाचे : महाराष्ट्रातील घडामोडी
author img

By

Published : Aug 10, 2020, 2:41 PM IST

Updated : Aug 10, 2020, 5:33 PM IST

राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात...

  • कोल्हापूर - जिल्ह्यात दिवसभरात 698 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यातील 154 जण तर 216 जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 21 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या तब्बल 10 हजार 729 च्यावर पोहोचली आहे. दरम्यान, रविवारी झालेल्या मृतांमध्ये 10 जण इचलकरंजी येथील होते. जिल्ह्यातील विशेषतः इचलकंजी, कोल्हापूर शहरासह करवीर आणि हातकणंगले तालुक्यांना कोरोनाचा विळखा बसला आहे.
  • सातारा - सेवानिवृत्त सनदी अधिकारी आणि राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देशमुख हे माण तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या खासगी कार्यक्रमांसाठी तसेच भेटीगाठी घेण्यासाठी गावी आले होते. या दरम्यान त्यांनी म्हसवड आणि दहिवडी येथे कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती. त्यानंतर ते आपल्या एका सहकाऱ्यासोबत पुण्याला परत आले होते. काही दिवसातच संबंधित सहकाऱ्याला त्रास जाणवू लागला असता त्याने कोरोना तपासणी केली. २ ऑगस्टला त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. यानंतर देशमुख यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केले. तसेच पुढील दोन दिवसात स्वॅब तपासणीसाठी दिला. या तपासणीचा अहवाल गुरुवार ६ ऑगस्टला आला. यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची काळजी घ्यावी तसेच कोरोनाबाबत काही लक्षणे आढळल्यास तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.
  • परभणी - परभणी जिल्ह्यात मागील 40 दिवसांत कोरोनाने कहर केला आहे. या कालावधीत रुग्णांची संख्या तब्बल 10 पटीने वाढली आहे. सध्या येथील एकूण रुग्णसंख्या 1 हजार 50 झाली आहे. यात 24 तासात नव्याने आढळलेल्या 53 रुग्णांचा तर 2 मृतांचा समावेश आहे. रविवारी 14 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत येथील एकूण 50 बाधितांचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत आणखी 204 संभाव्य रुग्ण दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण 454 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 546 जणांवर उपचार सुरू आहेत.
  • नंदुरबार - जिल्ह्यात रविवारी 42 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यामुळे एकूण येथील एकूण बाधितांची संख्या 860 वर पोहोचली आहे. येथील एकूण मृतांची संख्या 46 वर झाली आहे. रविवारी 11 जणांनी कोरोनावर मात केल्याने एकूण बरे झालेल्यांची संख्या 506 वर पोहोचली आहे. रविवारी आलेल्या अहवालानुसार नंदुरबार तालुक्यातील भालेर, रनाळे आणि शहादा तालुक्यातील प्रकाशा, लोणखेडा, नवापूर तालुक्यातील विसरवाडी या गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे.
  • अहमदनगर - जिल्ह्यात रविवारी 384 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर 483 नविन बाधितांची नोंद करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत एकूण बरे झालेल्यांची संख्या 6 हजार 250 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. येथील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 64.25 टक्के इतके आहे. सद्यस्थितीत उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 3 हजार 367 इतकी झाली आहे. रविवारी आढळून आलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमधील 41, मनपा 23, संगमनेर 1, राहाता 1, नगर ग्रामीण 10, कँटोन्मेंट 1, नेवासा 2, शेवगाव 1 आणि कोपरगांव 2 आदी रुग्णांचा समावेश आहे. तर अँटीजेन चाचणीत रविवारी 257 जण बाधित आढळुन आले. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 185 रुग्णांची बाधित आढळून आले आहेत.
  • अकोला - जिल्ह्यात रविवारी एकूण 41 जणांनी कोरोनावर मात केली. तर 38 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर शनिवारी रात्री एका बाधित महिलेचा मृत्यू झाला. ही महिला तेलीपुरा मूर्तिजापूर येथील रहिवासी होती. तिला 6 ऑगस्टला दाखल करण्यात आले होते. रविवारी आलेल्या 38 जणांच्या अहवालात 11 महिला आणि 27 पुरुष आहेत. त्यात मूर्तिजापूर येथील सात, दाळंबी येथील सहा, केळकर हॉस्पिटल येथील पाच, खांबोरा येथील तीन, खडकी येथील दोन, विठ्ठल नगर येथील दोन, तर अकोट, शिवाजी प्लॉट, रामदास पेठ, निमकर्डा आणि कैलास टेकडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच अकोलखेड ता.अकोट येथील चार, पिंपरी ता.अकोट येथील दोन आणि खांबोरा येथील दोन याप्रमाणे रहिवासी आहेत.
  • यवतमाळ - जिल्ह्यात रविवारी 104 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तसेच 24 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर याबरोबरच तीन बाधितांचा मृत्यु झाला. सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 416 आहे. तर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1 हजार 598 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 1 हजार 138 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
  • पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात रविवारी 1 हजार 92 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर 952 जणांनी कोरोनावर मात केली. तसेच 17 बाधितांचा मृत्यू झाला. दरम्यान, आत्तापर्यंत मनपा हद्द आणि ग्रामीण भागातील 601 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या 29 हजार 157 वर पोहोचली आहे. तर यातील 20 हजार 264 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मनपाच्या रुग्णालयात 4 हजार 871 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
  • जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने सुरू आहे. रविवारी जिल्ह्यात 456 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 14 हजार 343 इतकी झाली आहे. दुसरीकडे, रविवारी एकाच दिवशी 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी सर्वाधिक 96 पॉझिटिव्ह रुग्ण हे अमळनेर शहरात आढळले आहेत. त्या खालोखाल 77 पॉझिटिव्ह रुग्ण जळगाव शहरात आढळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अमळनेर शहरात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे पाहायला मिळत होते. मात्र, आता पुन्हा संसर्ग वाढू लागला आहे. चालू आठवड्यात अमळनेरात मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत. जिल्ह्यात जळगाव शहरासह अमळनेर, चोपडा, धरणगाव याठिकाणी कोरोनाचा संसर्ग अधिक आहे. रविवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जळगाव शहर 77, जळगाव ग्रामीण 14, भुसावळ 15, अमळनेर 96, चोपडा 56, पाचोरा 33, भडगाव 13, धरणगाव 27, यावल 04, एरंडोल 18, जामनेर 31, रावेर 18, पारोळा 24, चाळीसगाव 09, मुक्ताईनगर 13, बोदवड 06 तसेच अन्य जिल्ह्यात 02 असे एकूण 456 नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत.
  • नांदेड - जिल्ह्यात मागील 24 तासांमध्ये 217 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 141 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर याबरोबरच 4 बाधितांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 3 हजार 297 वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 120 इतकी झाली आहे. आतापर्यंत 1 हजार 632 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1 हजार 528 बाधितांवर उपचार सुरू आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता पार्श्वभूमीवर शहरातील कोरोना साखळी तोडण्यासाठी मनपाने उशिरा का होईना औरंगाबादेत यशस्वी झालेला पॅटर्न नांदेडमद्धेही राबविण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादच्या धर्तीवर नांदेडमद्धे व्यावसायिक व दुकानातील कर्मचाऱ्यांची कोरोना अँटीजन तपासणी करण्यात येणार आहे, याबाबत मनपा आयुक्तांनी परिपत्रक काढले आहे. जिल्ह्यात 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट पर्यंत अवघ्या आठवडाभरात तब्बल 1 हजार 141 बाधित वाढले आहेत. तर बळींचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. या आठवड्यात 30 बाधितांचा मृत्यू झाला आहे. दररोज सरासरी 150 च्या दरम्यान नागरिकांचा अहवाल बाधित येत आहेत. रविवारी प्रशासनाला 1188 जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले त्यापैकी 1006 नमूने निगेटीव्ह आले आहेत व 141 नमून्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यामद्धे आरटीपीसीआरद्वारे केलेल्या तपासणीत 62 रुग्ण आढळले आहेत तर अँटिजन टेस्ट किट्सद्वारे केलेल्या तपासणीत 79 बाधित रुग्ण आढळून आले.
  • वसई-विरार (पालघर) - याठिकाणी रविवारी 229 जणांनी कोरोनावर मात केली. तर याबरोबरच 226 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तसेच 7 बाधितांचा मृत्यू झाला आहे. रविवारी आढळलेल्या रुग्णांमुळे मनपा क्षेत्रातील एकूण बाधितांची संख्या 13 हजार 523 वर पोहोचली आहे. तर यातील 10 हजार 312 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 2 हजार 927 बाधितांवर उपचार सुरू आहेत.
  • भंडारा - जिल्ह्यात रविवारी 39 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. 8 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 12, लाखनी 2, पवनी 1, साकोली 1, तुमसर 4 व मोहाडी तालुक्यातील 19 व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 243 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर एकूण रुग्णसंख्या 409 वर पोहोचली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील वरठी स्थित सनफ्लॅग कंपनीत कोरोनाने शिरकाव केला आहे. मागील चार दिवसात 29 कामगार आणि अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मात्र, दररोज कोरोना पॉझिटिव्ह आढळत असूनही कंपनी उत्पादन थांबवित नसून कामगारांना कंपनीत बोलावून त्यांचे जीव धोक्यात घालत आहे. दररोज नवीन बाधित आढळत असल्याने कामगार आणि अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, जो कामावर येणार नाही त्याला कामावरून काढले जाईल, अशी धमकी कंपनी चालक देत असल्याने जीव मुठीत घेऊन कामगार कंपनीत येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
  • सांगली - जिल्ह्यात रविवारी 255 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील 172 जणांचा समावेश आहे. तसेच 116 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 9 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील अ‌ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 507 आहे. तर एकूण रुग्णसंख्या 4 हजार 706 वर पोहोचली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली. रविवारी आढळलेल्या बाधितांमध्ये सांगलीतील 3, मिरज 3, कुपवाड 1, तासगाव 2 व्यक्तींचा मृतांमध्ये समावेश आहे.
  • चिमूर (चंद्रपूर) - नगर परिषद क्षेत्रातील शेडेगाव येथील युवकाने घरी एकटा असताना इलेक्ट्रिक वायर गळ्याला गुंडाळून आत्महत्या केली. ही घटना आज (सोमवारी) 11 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. प्रंशात रतिराम नन्नावरे (वय - २० वर्ष) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. प्रशांत याने आईला घराबाहेर बसायला पाठवले. काही वेळाने आई घरी येऊन पाहिल्यावर दार आतुन लावुन होते. आवाज दिला असता आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी गावातच राहणाऱ्या प्रशातंच्या मोठ्या वडिलांना सांगितले. त्यांनीही आवाज दिला. मात्र, काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी घरावर चढून कौले काढून पाहिले असता प्रशांत गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. याप्रकरणी चिमूर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन तो शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले. तर आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत. तर यापूर्वीही त्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

Last Updated : Aug 10, 2020, 5:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.