मुंबई: राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर खार पोलीस ठाण्यात गेलेल्या सोमय्यांवर शिवसैनिकांनी बाटल्या आणि चपला फेकल्या. दरम्यान, गाडीची काच फुटून सोमय्या जखमी झाले. याप्रकरणी सोमय्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेत, शिवसैनिकांच्या अटकेची मागणी केली. माजी आमदार विश्वनाथ म्हाडेश्वर, दिनेश कुबल आदी दोन शिवसैनिकांना अटक करून जामिनावर सुटका झाली. या प्रकरणात आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
-
Maharashtra | BJP leader Kirit Somaiya reaches Khar Police Station to register an FIR.
— ANI (@ANI) April 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
"Mumbai Police has circulated a fake FIR of April 23 assault against me," he had tweeted. https://t.co/ErSClQVgCE pic.twitter.com/YwJ78znRVb
">Maharashtra | BJP leader Kirit Somaiya reaches Khar Police Station to register an FIR.
— ANI (@ANI) April 26, 2022
"Mumbai Police has circulated a fake FIR of April 23 assault against me," he had tweeted. https://t.co/ErSClQVgCE pic.twitter.com/YwJ78znRVbMaharashtra | BJP leader Kirit Somaiya reaches Khar Police Station to register an FIR.
— ANI (@ANI) April 26, 2022
"Mumbai Police has circulated a fake FIR of April 23 assault against me," he had tweeted. https://t.co/ErSClQVgCE pic.twitter.com/YwJ78znRVb
सोमय्यांनी ट्विट करत, आपण कोणतीही तक्रार केलेली नाही. २३ एप्रिलला झालेला एफआयआर माझा नाही, असे सांगत मंगळवारी यासंदर्भात तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे दाखल केलेला एफआयआर नेमका कोणी केला.? एफआयआरच दाखल केला नव्हता तर शिवसैनिकांना अटक कशी झाली? असे उलट सुलट प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
राज्यात हनुमान चालीसाचा वाद रंगला आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी शिवसेनेचे श्रध्दास्थान असलेल्या मातोश्रीवर चालीसा पठणाचा हट्ट धरला. वारंवार सोशल माध्यमातून तसे आव्हान केले. शिवसैनिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अखेर, रात्री उशिरा खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. दोघांनाही न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी लावलेले कलम रद्द करावे, अशी मागणी करत राणा दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला कान पिचक्या देत, कोठडी कायम ठेवली आहे.