मुंबई : ज्या विद्यार्थ्यांचे अंगठ्याचे ठसे आधार मध्ये जोडले जात नाही अशावेळी व्यवहार्य तोडगा शासनाने काढावा. महाराष्ट्रामध्ये मागील वर्षी इयत्ता पहिली ते दहावी दोन कोटी 25 लाख विद्यार्थी शालेय शिक्षण घेतात. यामध्ये शासनाच्या व्यवस्थापनाच्या तसेच खाजगी अनुदानित आणि विनाअनुदानित व्यवस्थापनाच्या अशा तीन प्रकारे शाळा आहेत. यामध्ये प्रत्येक शाळेला आपल्या इयत्तेतील वर्गातील किती विद्यार्थी आहेत आणि त्या प्रत्येकाचे आधार आहे का आणि ते आधार जोडणी शासनाच्या सरल प्रणालीमध्ये जोडावे लागते. हे जोडताना प्रत्येकाचे आधार क्रमांक त्याचा आधार कार्ड आणि त्याच्या बोटाचे ठसे हे जर जोडले गेले तर जोडणी अंतिमतः खात्रीपूर्वक होते. अन्यथा ती झाली नाही तर तो विद्यार्थी गणला जात नाही. कोरोना महामारीमुळे तेव्हापासून संख्या मान्यता आणि आधार जोडणी झालेली नव्हती. त्यामुळे जर शिक्षक भरती करायचे तर विद्यार्थी किती आहे ते समजले पाहिजे.
शासनाच्याच वेब पोर्टलमध्ये मुदत वाढवावी लागली : गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आणि मुंबईसारख्या शहरात देखील आधार जोडणी करताना शासनाचे वेब पोर्टल मधेच बंद असायचे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे हातांच्या बोटांचे ठसेच आधारमध्ये नोंदवले जात नाही, त्यामध्ये खात्रीपूर्वक त्याची इमेज येत नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे काय करायचे असा प्रश्न शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनांनी विचारला होता. म्हणून आता ही मुदत शासनाने 30 एप्रिल रोजी अखेरची होती. त्यामध्ये वाढ करून 15 मे 2023 पर्यंत केली. परंतु यामध्ये अनेकांनी तक्रारीचा सूर लावलेला आहे.
काही बोगस पटसंख्या दाखवून अनुदान : यासंदर्भात माजी शिक्षण अधिकारी आणि शासनाच्या सेवेत प्रदीर्घ प्रशासकीय काम केलेले सेवानिवृत्त अधिकारी भाऊ गावडे यांनी सांगितले की, खरंतर सर्वोच्च न्यायालयाच्या याबाबत निकाल आहे. परंतु शासन जे आधार जोडणी करत आहे त्यामागे कारण देखील आहे. ते अनेक बोगस पद्धतीने शाळेमध्ये मुलांच्या पटसंख्या दाखवल्या जातात. त्याच्यामुळे बेकायदेशीर अनुदान काही शाळांकडून उकळले जाते. त्याच्यामुळे शासन जे याबाबत पाठपुरावा आणि आग्रह करतात ते बरोबर आहे. परंतु यातून एक व्यवहार्य तोडगा काढला जावा. कारण मुलांचे ठसे जर आधार जोडणीच्या वेळी येत नाही तर मग काय करायचं हा प्रश्न होता. तर व्यवहार्य थोडा काढून शासनाने संपूर्ण यंत्रणा जर लावली, तर मॅन्युअल पद्धतीने सहज सोपं काम काही दिवसात शासनाला करता येऊ शकतं.
आधार जोडणी प्रक्रिया चालू ठेवत शिक्षक भरती सुरू करावी : महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे नेते शिवनाथ दराडे यांचे म्हणणे आहे की, आहे ते विद्यार्थी सध्या गृहीत धरून आधार जोडणी मान्य करून संच मान्यता करावी. शिक्षक भरती प्रक्रिया स्वीकार करावी. जे विद्यार्थी यामध्ये जोडले जाणार नाही त्यांना जूनमध्ये आपण जोडणी करावी.