ETV Bharat / state

एल्गार परिषद प्रकरण : सामाजिक कार्यकर्ते फादर स्टेन स्वामी यांची जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव - फादर स्टेन स्वामी यांची जामिन

तुरूंगात असलेले सामाजिक कार्यकर्ता स्टेन स्वामी आपले म्हातारपणाचे कारण आणि अनेक आजारांनी ग्रस्त आहे. या कारणावरून जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात आहे.सत्र न्यायालयाने स्वामींना जामीन नाकारताना म्हटले होते की, वृद्धापकाळ आणि आजारपण यासारख्या कारणासाठी आरोपींच्या बाजूने निर्णय दिला जाणार नाहीत, कारण त्यांच्यावर सरकार उलथून टाकण्याच्या कट रचल्याचा आरोप आहे.

फादर स्टेन स्वामी
फादर स्टेन स्वामी
author img

By

Published : Apr 29, 2021, 8:38 PM IST

मुंबई - एल्गार परिषद प्रकरणात अटक झालेल्या आदिवासी हक्क कार्यकर्ते स्टेन स्वामी यांनी आरोग्याच्या कारणास्तव जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अपीलात 83 वर्षीय स्टेन स्वामी यांनी गेल्या महिन्यात जामीन नाकारण्याच्या सत्र न्यायालयाने पास केलेल्या आदेशाला आव्हान दिले आहे. तुरूंगात असलेले सामाजिक कार्यकर्ता स्टेन स्वामी आपले म्हातारपणाचे कारण आणि अनेक आजारांनी ग्रस्त आहे. या कारणावरून जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात आहे.सत्र न्यायालयाने स्वामींना जामीन नाकारताना म्हटले होते की, वृद्धापकाळ आणि आजारपण यासारख्या कारणासाठी आरोपींच्या बाजूने निर्णय दिला जाणार नाहीत, कारण त्यांच्यावर सरकार उलथून टाकण्याच्या कट रचल्याचा आरोप आहे. उच्च न्यायालयात स्वामींचे अपील आता सुनावणीसाठी येणार आहे.

नवी मुंबईतील तळोजा तुरूंगात 40पेक्षा अधिक कैद्यांना कोरोना संसर्गाची लागण झाली असल्याचे स्वामींनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. स्वामींना 8 ऑक्टोबर 2020 रोजी रांची येथील त्याच्या घरातून अटक करण्यात आली होती. हे प्रकरण पुण्यातील शनिवारवाडा येथे 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या 'एल्गार परिषद'च्या अधिवेशनात कथित भडकाऊ भाषणांशी संबंधित आहे. पोलिसांनी सांगितले, की या प्रक्षोभक भाषणानंतर दुसर्‍याच दिवशी पुणे शहराच्या बाहेरील कोरेगाव-भीमा युद्ध स्मारकाजवळ हिंसाचार पसरला. पुणे पोलिसांनी दावा केला, की या संमेलनाला माओवाद्यांशी संबंध असलेल्या लोकांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर एनआयएने या प्रकरणातील चौकशीची सूत्रे हाती घेतली असून या प्रकरणात डझनभर कार्यकर्त्यांना आरोपी बनवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.