ETV Bharat / state

मुंबईतील सहा वर्षाच्या अबू झर शेखला उपचारासाठी 16 कोटींच्या इंजेक्शनची गरज - Diagnosis of a rare disease called spinal muscular atrophy (SMA)

मुंबईतील मलाड येथे राहणाऱ्या अब्दुल माजिद शेख यांच्या सहा वर्षीय अबु झर शेख मुलाला स्पायनल मस्क्युलर ऍस्ट्रॉफी (एसएमए) या दुर्मिळ आजाराचे निदान झाले. आणि या उपचारासाठी आवश्यक असणारी इंजेक्शनची किंमत 16 कोटी रुपये असल्याने पालकांच्या पायाखालची जमीन सरकरली आहे.

Video is not recived
उपचारासाठी 16 कोटींच्या इंजेक्शनची गरज...
author img

By

Published : Aug 12, 2021, 10:48 PM IST

मुंबई - मुंबईतील अबू झर शेख नावाच्या ६ वर्षाच्या मुलाला स्पायनल मस्क्युलर ऍस्ट्रॉफी ( Spinal muscular atrophy) या अतिदुर्धर आजाराने ग्रासले आहे. त्याला झालेल्या आजारावरील उपचार अत्यंत महागडा असून त्यातील एका इंजेक्शनची किंमत तब्बल 16 कोटी रुपये आहे. हे इंजेक्शन फक्त अमेरिकेत मिळते. त्यामूळे अबूच्या पालकांच्या पायाखालची जमीन सरकरली असून त्यांनी दात्याकडे मदतीची मागणी केली आहे

मुंबईतील मलाड पूर्व येथील संजय नगर परिसरात राहणाऱ्या अब्दुल माजिद शेख यांच्या सहा वर्षीय अबु झर शेख मुलाला स्पायनल मस्क्युलर ऍस्ट्रॉफी (एसएमए) या दुर्मिळ आजाराचे निदान झाले. आणि या उपचारासाठी आवश्यक असणारी इंजेक्शनची किंमत 16 कोटी रुपये असल्याने पालकांच्या पायाखालची जमीन सरकरली आहे.

मुलाच्या जन्माचा आनंद जसा सर्व पालकांना होतो तसाच अबुच्या आई वडिलांना झाला होता. मात्र, काही महिन्यांनी अबुला असा काही त्रास सुरु झाला की त्याच्या रुग्णालयातील फेऱ्या वाढल्या. लहान मुलांच्या डॉक्टरांपासून ते विविध वैद्यकीय शाखेतील डॉक्टरांना त्याला वैद्यकीय सल्ल्यासाठी जावे लागले. अबूच्या निदानासाठी काही कालावधी गेला आणि दोन वर्षांनी अबू झरला स्पायनल मस्क्युलर ऍस्ट्रॉफी (SMA) या दुर्मिळ आजाराचं निदान झाले. ज्यावेळी या आजाराच्या उपचाराची माहिती अबूच्या आई वडिलांनी घ्यायची ठरविली तर आपल्या देशात या आजारावर ठोस असे उपचार नसून याकरीता लागणारी महागडी औषधे अमेरिकेतील फार्मा कंपनीत मिळतात. या उपचारासाठी आवश्यक असणारी इंजेक्शनची किंमत 16 कोटी रुपये असून पैसे आणायचे कसे आता असा प्रश्न पडला आहे.

अबू झर शेख ला लागणाऱ्या 16 कोटीच्या इंजेक्शनची किंमत त्याच्या घरच्यांना परवडणारी नाही आहेत. त्यामुळे घरच्यांनी आता मुंबईकर जनतेला आणि कलाकारांना गाऱ्हाणं घातलं आहे. अबू सुद्धा त्याच्या आवडत्या अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान यांनी मदत करावी अशी विनंती करत आहे.

हेही वाचा - मोदी सरकारच्या दबावामुळे काँग्रेस नेत्यांचे ट्विटर अकाऊंट बंद, नाना पटोलेंचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.