नवी मुंबई - प्रसिद्ध गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांच्या सुर्योदया फाऊंडेशनतर्फे पनवेल महापालिकेला 2 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर भेट देण्यात आले. पालिकेच्या आरोग्य विभागाला ते सुपूर्द करण्यात आले. यातून अनुराधा पौडवाल यांनी सामाजिक बांधिलकी जपल्याचे दिसत आहे.
१९८५ पासून सुर्योदया फाऊंडेशन कार्यरत
अपात्कालीन परिस्थितीत शासनाला नेहमीच मदतीचा हात पुढे करत १९८५ पासून सुर्योदया फाऊंडेशन सामाजिक बांधिलकी जपत आहे. कोरोनाच्या महाभयंकर काळात मोठ्या प्रमाणात रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासला. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. ही अडचण लक्षात घेऊन सर्वोदया फाऊंडेशनच्या अनुराधा पौडवाल यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी वैद्यकीय उपकरणे भेट दिली जात आहेत.
'पनवेल महापालिकेस ५ लिटर क्षमतेचे 2 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर भेट देण्यात आले. तसेच ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल त्या ठिकाणी सुर्योदया फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य अविरतपणे सुरू राहिल', असा विश्वास अनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केला.
आयुक्त सुधाकर देशमुखांनी मानले आभार
अनुराधा पौडवाल यांनी स्वतः पनवेल महापालिकेत येऊन सुर्योदया फाउंडेशनच्या माध्यमातून 2 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर पनवेल पालिकेला दिले. तर, पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी अनुराधा यांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा - नवऱ्याचं दोन पत्नींमध्ये वाटप, दोघींसोबत राहणार ३-३ दिवस, राहिलेला १ दिवस...