ETV Bharat / state

Vikas Walkar : श्रद्धाचे वडील विकास वालकर बोलतात भाजपची भाषा?; वाचा संपूर्ण प्रकरण

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर ( Shraddha Walker Murder Case ) देशातले वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी आज उपमुख्यमंत्र्यांची ( Vikas Walkar met Deputy CM ) भेट घेऊन पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेत त्यांनी लव्ह जिहादबाबत ( love jihad ) नवा प्रश्न उपस्थित करत मुलींना अठरा वर्षांनंतर स्वातंत्र्य द्यायचे का? असा नवा प्रश्न उपस्थित केला.

Vikas Walker Met Deputy CM
Vikas Walker Met Deputy CM
author img

By

Published : Dec 9, 2022, 8:15 PM IST

Updated : Dec 9, 2022, 10:08 PM IST

मुंबई - वसईतील श्रद्धा वालकर ( Shraddha Walker Murder Case ) या तरुणीची दिल्लीत आफताब पूनावाला याने निर्दयी हत्या केली. यानंतर हे प्रकरण संपूर्ण देशभर गाजले दिल्ली, वसई पोलीस याप्रकरणी कसून तपास करीत आहेत. मात्र या प्रकरणातील श्रद्धाचे वडील विकास वालकर ( Vikas Walkar ) अखेर आज प्रसार माध्यमांसमोर आले तत्पूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट ( Vikas Walkar met Deputy CM ) घेतली.

रविंद्र आंबेकर राजकीय विश्लेषक

वालकर बोलतात भाजपची भाषा? - त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली मात्र या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत भाजपाचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या सातत्याने सावली सारखे वावरताना दिसले. यावेळी वालकर यांनी त्यांना लिहून दिलेले निवेदन प्रसार माध्यमांसमोर वाचले. मात्र, ते वाचत असतानाही अनेक वेळा किरीट सोमय्या त्यांना मागून सूचना देत असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी बोलताना वालकर यांनी तुळींज पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर, श्रद्धा वाचली असती असे सांगितले.

Vikas Walkar

लव जिहाद, धर्मांतर आणि स्वातंत्र्य - यानंतर बोलताना विकास वालकर यांनी लव जिहादचा ( love jihad ) उल्लेख केला. आरोपी अफताबला फाशी झाली पाहिजे असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच धर्मांतर विषयी त्यांनी सूचक उल्लेख केला. मुलींना अठरा वर्षानंतरही स्वातंत्र्य द्यावे का असा प्रश्न उपस्थित केला. मात्र, हे प्रश्न विकास वालकर यांचे होते की भाजपाचे असा नवा सवाल आता समोर आला आहे. त्याचे कारण वालकरांची भाषा भाजपचे नेते बोलताना दिसत आहेत.

धर्मांतर विरोधी कायदा व्हावा नितेश राणे - विकास वालकर यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर थोड्याच वेळात नितेश राणे यांनी हा धागा पकडत देशात धर्मांतर विरोधी कायदा झालाच पाहिजे. हिंदू मुलींना जाळ्यात फसवून त्यांचे धर्मांतर करण्याचे प्रकार होत आहेत. हे थांबले पाहिजेत यासाठी हा कायदा आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. लव जिहादच्या घटना थांबवायचे असतील, मुलींचे संरक्षण करायचे असतील, तर अशा पद्धतीचा कायदा महाराष्ट्रात आणला गेला पाहिजे.

हिंदुत्वाची प्रयोगशाळा करण्याचा प्रयत्न- आंबेकर श्रद्धा वालकरचा मृत्यू हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. ही एक गुन्हेगारी स्वरूपाची मोठी घटना आहे. या घटनेकडे त्याच दृष्टीने पाहिलं पाहिजे अन्यथा त्याचे गांभीर्य कमी होईल. भाजप श्रद्धा वालकर प्रकरणाचा वापर धर्माच्या राजकारणासाठी करीत आहे. ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे अशी प्रतिक्रिया जेष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकर यांनी व्यक्त केली आहे. वास्तविक या निमित्ताने धर्मांतराचा लव जिहाद चा विषय समोर आणून महाराष्ट्राला हिंदुत्वाची प्रयोगशाळा बनवण्याचा हा भाजपचा डाव आहे. भाजपने अशा प्रकरणांचे राजकारण करू नये त्याला धार्मिक रंग देऊन राजकारणासाठी वापर करू नये असेही आंबेकर म्हणाले.

श्रद्धा सारख्या मुली वाचवणे आवश्यक - लोढा दरम्यान या संदर्भात बोलताना पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, श्रद्धा वालकर सारख्या मुली वाचवायच्या असतील तर, सक्षम कायदा आणलाच पाहिजे धर्मांतराचा कायदा केल्यास अशी प्रकरण होणार नाही. मुलींचे रक्षण होईल श्रद्धा वाचल्याच पाहिजे अशी भूमिका लोढा यांनी व्यक्त केली.

Last Updated : Dec 9, 2022, 10:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.