मुंबई : लक्ष्मीची पूजा ( Lakshmi Pujan ) केल्याने घरात धन, सुख आणि समृद्धी येते. यासोबतच संपत्तीचा देव कुबेर यांचीही पूजा या दिवशी केली जाते. हिंदू मान्यतेनुसार, भगवान विष्णूचा अवतार भगवान धन्वंतरी यांचा जन्म धनत्रयोदशीच्या दिवशी झाला ( Diwali 2022 ) होता. त्याची पूजाही धनत्रयोदशीला केली जाते. 22 ऑक्टोबर रोजी शनिवारी संध्याकाळी 06:02 वाजता होईल आणि 23 ऑक्टोबर रोजी रविवारी संध्याकाळी 06.03 वाजता संपेल. धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त 21 मिनिटांचा असेल. 23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त 05:44 ते 06:05 पर्यंत असेल. प्रदोष कालाची वेळ 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:44 ते रात्री 8:16 पर्यंत आणि वृषभ कालची वेळ 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.58 ते 8:54 पर्यंत असेल.
रंगीबेरंगी पणत्यांची खरेदी : लक्ष्मीपूजन हे हिंदू धर्मातील स्त्रिया मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातील सर्व मंडळी विविध कामे करण्यात मग्न असतात. सायंकाळी घरात सगळीकडे पणत्या लावून हा सण साजरा करतात. त्यासाठी बाजारातून रंगीबेरंगी पणत्या आणल्या ( Shopping for Lakshmi Pujan ) जातात. तर एका लाकडी पाटावर झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या ठेवून अक्षदांचे स्वस्तिक काढतात. त्यावर श्री लक्ष्मी व श्री कुबेराची मूर्ती ठेऊन त्यांची मनोभावाने पूजा करतात. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे. तर कुबेर हा संपत्ती रक्षक आहे. लक्ष्मीपूजनावेळी या दिवशी महाराष्ट्रीयन कुटूंबात पुरणाचा किंवा दुधाच्या खिरचा नैवेद्य देवी लक्ष्मीला दाखवला जातो.
आंब्याच्या पाणांचे, झेंडुचे तोरण : दिवाळीत ( Diwali Celebration ) लक्ष्मीपूजनाची तयारी करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने, झेंडुची फुले यांचा समावेश असलेले तोरण आवर्जुन लावले जाते. घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी गंगाजल, हळद, कापूर एकत्र करून घरातील प्रवेशद्वाराजवळ शिंपडले जाते. दिवाळीतील लक्ष्मीपूजन किंवा अन्य कोणत्याही पूजनावेळी देवघरात कुंकू किंवा शेंदूराचा वापर करून स्वस्तिक काढतात, असे सांगितले जाते. स्वस्तिक चिन्ह हे गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते. स्वस्तिक चिन्हामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो अशी मान्यता आहे. सुख, समृद्धीत वृद्धी होते, असे सांगितले जाते.
पूजेत आवश्यक गोष्टींची खरेदी : पूजेच्या वेळी शांत चित्ताने पूजा करावी. माता लक्ष्मीची आरती करावी. पूजेत झाडू, अक्षदा, कमळाचे फुल, कवड्या, ऊस, शिंगाडे, मिठाई किंवा दुधाची खिर, झेंडूची पिवळी फुले, सुपारी, लाल धागा, विड्याची पाने, माता लक्ष्मी व गणपतीचे चित्र असलेला चांदिचा शिक्का, श्री यंत्र, धानाच्या लाह्या आणि त्या ऋतु मध्ये मिळणारी पाच फळे या गोष्टी आवर्जुन ठेवाव्या.
लक्ष्मीची पूजा : सर्व प्रथम, आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला. भगवान धन्वंतरीची मूर्ती किंवा चित्र स्वच्छ ठिकाणी स्थापित करा आणि पूर्व दिशेला तोंड करून बसा. त्यानंतर या मंत्राने भगवान धन्वंतरीचे आवाहन करावे. 'सत्यं च येन निरतं रोगं विधूतं, 'अन्वेषित च सविधिं आरोग्यमस्य।' आणि 'गूढं निगूढं औषध्यरूपम्, धन्वन्तरिं च सततं प्रणमामि नित्यं।।' या मंत्राचा जप करावा.यानंतर पूजास्थळी आसन देण्याच्या भावनेने तांदूळ अर्पण करा. आचमनसाठी पाणी सोडा आणि भगवान धन्वंतरीला वस्त्र (माउली) अर्पण करा. भगवान धन्वंतरीच्या मूर्तीवर किंवा चित्रावर अबीर, गुलाल पुष्पा, रोळी आणि इतर सुगंधी वस्तू अर्पण करा. चांदीच्या भांड्यात खीर अर्पण करा. (चांदीची भांडी नसल्यास, इतर कोणत्याही भांड्यातही भोग देऊ शकता.) त्यानंतर आचमनसाठी पाणी सोडावे. मुखशुद्धीसाठी सुपारी, लवंग, सुपारी अर्पण करा. भगवान धन्वंतरीला शंखपुष्पी, तुळशी, ब्राह्मी इत्यादी पूजनीय औषधी अर्पण करा. यानंतर रोगाच्या नाशासाठी या मंत्राचा जप करावा. मंत्र - 'ओम रम रुद्र रोग नाशय धन्वंतरे वसा ।' त्यानंतर भगवान धन्वंतरीला श्रीफळ आणि दक्षिणा अर्पण करा. पूजेच्या शेवटी कर्पूर आरती करावी.