मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही नाताळनिमित्त ( Occasion of Christmas ) सुट्टीला गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या मुंबई विभागामार्फत मुंबई सेंट्रल ते पणजी अशी वातानुकूलित शिवशाही बस सेवा ( Shivshahi bus service ) सुरु केली आहे.
अशी असेल सेवा : ही बस दररोज संध्याकाळी 4:30 वाजता मुंबई सेंट्रल येथून निघून पनवेल, महाड, चिपळूण, कणकवली, सावंतवाडी मार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता पणजी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात देखील पणजी हून संध्याकाळी 4:30 वाजता निघून त्याच मार्गाने मुंबई सेंट्रल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता पोहोचेल. या बसचे मुंबई ते पणजी तिकीट रु. 1245 इतके आहे.
बससेवा जानेवारीपर्यंत सुरू : प्रवाशांच्या सोयीसाठी सदर बस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच प्रवासी msrtc mobile reservation app वरुन देखील आपले आसन आरक्षित करू शकतात. ही बस सेवा 1 जानेवारी 2023 पर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे. तरी प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे नेते श्रीरंग बर्गे यांनी म्हटलेले आहे की," नाताळच्या सुट्टीनिमित्त शिवशाही बस सेवा सुरू केली हे चांगले आहे . मात्र प्रवासी अधिक मिळत नाही नाहीतर तिचा कालावधी देखील वाढवता आला असता.