ETV Bharat / state

काहींचा मेंदू साफ करण्याची गरज, संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

author img

By

Published : Feb 18, 2021, 1:32 PM IST

लडाखमधील सैन्यांच्या संघर्षानंतर भारत आणि चीनमधील नियंत्रण रेषेवरील तणाव कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. चिनी सैन्य माघारी जात असल्याचे व्हिडिओ आणि फोटो हे समोर आले आहेत. शिवसेनेने या घटनेत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडल आहे. राष्ट्रीय सुरक्षेबाबत ही बनवाबनवी सुरू असल्याचे आजच्या संपादकीयमध्ये सांगण्यात आले असून चीन घुसखोरी प्रकरणात देशाचे राज्यकर्ते सतत खोटे का बोलत राहिले ? असा सवाल शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे.

संजय राऊतांचा भाजपावर निशाणा
संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक शैलीमध्ये पुन्हा एकदा भाजपवरती निशाणा साधला आहे. ट्विटरवरती एक फोटो शेअर करत काहींना मेंदू साफ करण्याची गरज आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. लडाखमधील सैन्यांच्या संघर्षानंतर आता भारत आणि चीनमधील नियंत्रण रेषेवरील तणाव कमी होऊ लागला आहे. चिनीसैन्य भारतीय हद्दीतून माघारी जात आहे, त्याचा भाजपाकडून जल्लोष केला जात आहे. त्यावरूनच आता खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या संपादकीय मधूनदेखील केंद्र सरकारचे कान टोचले आहेत, तसेच अशा प्रकारे कोणी जल्लोष करत असेल तर त्यांचा मेंदू तपासावा, असा खोचक सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

संजय राऊतांचा भाजपावर निशाणा
संजय राऊतांचा भाजपावर निशाणा
काय लिहल आहे आजच्या संपादकीय मध्ये-

चीन माघारी जात आहे ही आनंदाची गोष्ट आहे. हिंदुस्थानी संरक्षण खात्याच्या मुत्सद्देगिरीचा हा विजय आहे हे मान्य, पण चीन घुसखोरी प्रकरणात देशाचे राज्यकर्ते सतत खोटे का बोलत राहिले? प्रश्न इतकाच आहे की, चीनचे सैन्य आमच्या हद्दीत इंचभरही घुसलेले नाही, विरोधक भ्रम आणि अफवा पसरवत आहेत, असे जे गेले वर्षभर सरकारतर्फे सर्वच पातळ्यांवर सांगितले गेले, त्या सर्व थापाच होत्या असेच आता स्पष्ट झाले आहे. चिनी सैन्य माघार घेत असल्याचा उत्सव सरकारनेच सुरू केला. याला कुणी विजयाचा उत्सव म्हणत असतील तर त्यांचे मेंदू तपासायला हवेत. राष्ट्रीय सुरक्षेबाबत ही बनवाबनवीच सुरू असेल तर काय करायचे?,” असा प्रश्न केंद्र सरकला विचारण्यात आला आहे.

पंतप्रधान देशाशी खोटे बोलत होते-

“चीनचे हिंदुस्थानच्या हद्दीत घुसलेले सैन्य माघारी जात आहे या घटनेचा राजकीय उत्सव सुरू झाला आहे. वर्षभर चिनी सैन्याने आमच्या जमिनीवर वीसेक किलोमीटरपर्यंत घुसखोरी केली होती. त्या संघर्षात आमचे 20 जवान गलवान व्हॅलीत शहीद झाले. सैनिकांच्या बलिदानावर विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारून भंडावून सोडले. या काळात पंतप्रधानांसह भाजपचे अनेक नेते व मंत्री अनेक फुटकळ विषयांवर बोलत राहिले, पण चीनच्या घुसखोरीवर प्रश्न विचारले की, पलायन करीत. शेवटी चारेक दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत माहिती देऊन चीनशी समझोता झाल्याचे जाहीर केले. पंतप्रधान मोदी हे दोन महिन्यांपूर्वी सांगत होते, चीनने आमच्या हद्दीत अजिबात घुसखोरी केलेली नाही. तेच पंतप्रधान आता चीनने आपली जमीन मोकळी केल्याचे सांगत आहेत. म्हणजे चीनने घुसखोरी केली हे सत्य होते व पंतप्रधान देशाशी खोटे बोलत होते,” असा आरोप देखील या संपादकीयमध्ये करण्यात आला आहे.

हद्दीत न घुसलेले सैन्य माघारी कसे जात आहे?

आता या विषयाचा जो राजकीय विजयोत्सव सुरू आहे तो गमतीचा आहे. खूप मोठे शौर्य गाजविल्याचा प्रचार व प्रसिद्धी मोहिमा राबविल्या जात आहेत. पंतप्रधानांच्या मते जे सैन्य आमच्या हद्दीत कधी घुसलेच नव्हते ते सैन्य कसे माघारी जात आहे, ‘पँगाँग’लगतची चिनी बांधकामे कशी उद्ध्वस्त केली आहेत याच्या चित्रफिती प्रसिद्ध केल्या जात आहेत. पँगाँग परिसरात चिन्यांनी ठोकलेले तंबू काढले जात असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली जात आहेत. चीन माघारी जात आहे ही आनंदाची गोष्ट आहे. हिंदुस्थानी संरक्षण खात्याच्या मुत्सद्देगिरीचा हा विजय आहे हे मान्य, पण चीन घुसखोरी प्रकरणात देशाचे राज्यकर्ते सतत खोटे का बोलत राहिले, हा प्रश्न अनुत्तरित आहे,” असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.