मुंबई - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा फायदा भाजपला होईल, अशा प्रकारची भाषणं झाली. पण, तरीही झारखंडच्या गरीब आणि आदिवासी जनतेनं भाजपला नाकारलं आहे. तिथे सध्या हाती आलेल्या कलानुसार झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपला आता आत्मचिंतनाची गरज असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी झारखंड निकालावर दिली.
हेही वाचा - 'सत्तेत असताना 'सामना' वाचला असता, तर सत्ताही वाचली असती'
महाराष्ट्रानंतर झारखंड हे राज्य भाजपच्या हातातून गेले आहे. तिकडे झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे. आधी भाजपची सत्ता तिकडे होती. पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी हे राज्य जिंकण्यासाठी ताकद लावली. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे राऊत म्हणाले.
अमृता फडणवीस यांच्याविषयी विचारले असता संजय राऊत म्हणाले, की अमृता फडणवीस यांच्या टीकेवर शिवसेनेची महिला आघाडीचे उत्तर देईल.