ETV Bharat / state

'आयएनएस विराट टिकवण्यासाठी एनओसी मंजूर करायला त्वरित हस्तक्षेप करावा'

'आयएनएस विराट टिकवण्यासाठी एनओसी मंजूर करायला त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहिले.

priyanka chaturvedi
प्रियंका चतुर्वेदी
author img

By

Published : Dec 14, 2020, 5:22 PM IST

Updated : Dec 14, 2020, 7:32 PM IST

मुंबई - 'आयएनएस विराट टिकवण्यासाठी एनओसी मंजूर करायला त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहिले.

shivsena mp priyanka chaturvedi wrote letter to defence minister rajnath singh over ins virat
खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आयएनएसबाबत राष्ट्रपतींना लिहिलेले पत्र.
  • काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी?

पत्रात चतुर्वेदी यांनी लिहिले आहे की, या ऐतिहासिक युद्धनौकेचे पुनरुज्जीवन व जतन करण्यात महाराष्ट्र आनंदित आहे. यामुळे आयएनएस विराटच्या संरक्षणासाठी एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) देण्यासाठी त्वरित हस्तक्षेप करा, अशी मागणी त्यांनी केली. गुजरातमधील अलांगमध्ये आयएनएस विराटला जंकमध्ये बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही अत्यंत वाईट आणि काळजीची बाब आहे, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा - जगभरात गुगलच्या सेवेवर परिणाम; गुगलसह यूट्यूबही ठप्प

दरम्यान, राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचे हे पत्र अशा वेळी आले आहे की, सेवेतून मुक्त झालेल्या विमानवाहक जहाज आयएनएस विराटला गुजरातमधील अलंग येथे नेण्यात आले होते. शिप ब्रेकर कंपनी ही या युद्धनौकेला तोडून भंगारात टाकणार आहे.

  • आएनएस विराट देशाचा अभिमान...

आयएनएस विराट भारत आणि देशाच्या नौदलाचा अभिमानास्पद भाग राहिला आहे. यामुळे राष्ट्रभक्ति, गर्व आणि भारताच्या राष्ट्रवादाची अनुभूती येते. यामुळे आपण आपल्या समृद्ध असलेल्या इतिहासाला नष्ट करण्याऐवजी त्याचे संरक्षण केले पाहिजे. तसेच आयएनएस विराटला संरक्षित करण्यासाठी आपण मंजुरी द्यावी, अशी मागणीही त्यांनी आपल्या पत्राद्वारे संरक्षणमंत्र्यांना केली.

  • आयएनएस विराटला तोडण्यापासून वाचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

भारतीय नौदलाचा सेवानिवृत्त भारतीय युद्धनौका विराट तोडण्यापासून व जंकमध्ये रुपांतर होण्यापासून रोखण्यासाठी कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आयएनएस विराटला तोडण्यापासून वाचवण्यासाठी कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

विराटचे संग्रहालय बनण्याची आशा लोटत आहे आणि एका कंपनीने ती मोडण्यासाठी खरेदी केली आहे. जवळजवळ तीन आठवड्यांपर्यंत प्रतिक्षा करून त्यांनी गुजरातच्या अलांग येथील भंगार यार्डकडे विराटला वळविले आहे. मुंबईस्थित खासगी कंपनी इनव्हिटेक मरीन कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेडने गेल्या महिन्यात विराटला संग्रहालयात रूपांतरित करण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु कंपनीला अद्याप यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालेले नाही.

  • आयएनएस विराटचा इतिहास -

जगातील सर्वात जुने व भारतातील सर्वात मोठे विमानवाहू जहाज 'आयएनएस विराट' मार्च 2017ला भारतीय नौदलातून सेवानिवृत्त झाले होते. यावर्षी 28 सप्टेंबरला भावनगर जिल्ह्यातील अलंग समुद्रकिनाऱ्यावर त्याचे तोडकाम करण्यास सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. गुजरातमधील अलंगमध्ये श्रीराम ग्रुप हा जहाज तोडणीचा प्रकल्प आहे.

  • जगातील सर्वात प्रदीर्घ काळ सेवा देणारी युद्धनौका

आयएनएस विराट या विमानवाहू जहाजाने 30 वर्षे नौदलात महत्त्वपूर्ण कामगिरी बजाविली आहे. सर्वात जुनी युद्धनौका अशी आयएनएस विराटची ओळख आहे. हे जहाज नोव्हेंबर 1959 ते एप्रिल 1984 दरम्यान इंग्लंडचा नेव्हीमध्ये सेवेत होते. नंतर त्याची दुरुस्ती आणि बळकट करून 1987 मध्ये भारतीय नौदलात तो सामील झाला. श्रीराम ग्रुपने मेटल स्क्रॅप ट्रेडच्या लिलावातून आयएनएस विराट ही 38.54 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. कारगिल युद्धावेळी पाकिस्तानच्या कराची बंदरातून युद्धनौका बाहेर पडू नये, यासाठी शत्रूवर वचक ठेवण्याची कामगिरी या जहाजाने केली होती.

आयएनएस विराट ही भंगारात काढण्याचा निर्णय भारतीय नौदलाशी चर्चा करून घेण्यात आल्याचे केंद्र सरकारने गेल्या वर्षी संसदेत सांगितले होते. आयएनएस विराट ही भारतीय नौदलाने 65 दशलक्ष डॉलरला खरेदी केली होती. यापूर्वी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतदेखील 2014 मध्ये भंगारात काढण्यात आली आहे. या युद्धनौकेचे वस्तुसंग्रहालयात रुपांतरण करावे, अशी नागरिकांनी मागणी केली होती.

Last Updated : Dec 14, 2020, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.