मुंबई : मुंबई महानगपालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनेही कंबर कसली असून, शिंदे गटाचीही साथ भाजपला मिळणार आहे. महापालिकेच्या कारभारावर विरोधकांकडून टीका केली जात असताना ठाकरे गटातील एक नगरसेवक गेले अनेक दिवसांपासून २५ लाखांच्या खंडणीप्रकरणी फरार होता. अटक करण्यात आलेल्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचे नाव योगेश भोईर ( yogesh bhoir arrested) असे आहे. ( Shivsena ex Corporator in udhav thackeray faction )
ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात : भाजपकडून सातत्याने मुंबई महानगरपालिकेतील गैरव्यवहार ( Yogesh bhoir arrested in extortion case ) आणि कारभारावरून शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला जात आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप अधिक आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. यातच आता नगरसेवकास अटक झाल्याने ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात, असे सांगितले जात आहे. ( Malpractice in BMC )
15 दिवसांपासून फरार नगरसेवकाचा पोलिसांकडून होता शोध सुरू : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे ( Magathane Assembly Constituency ) उपविभाग प्रमुख योगेश भोईर यांच्यावर खंडणीचा गुन्हा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दाखल झाला असून, ते या प्रकरणात फरार झाले होते. गुन्हे शाखेकडून ( mumbai crime branch ) त्यांचा शोध सुरू होता. आज त्यांना अटक करण्यात आली आहे. एस. डी कॉर्पकडून २५ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप भोईर यांच्यावर करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर योगेश भोईर हे फरार होते असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात भीमसेन यादव या आरोपीला आधीच अटक करण्यात आली. योगेश भोईर हे या खंडणी प्रकरणात सहआरोपी आहेत.
आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत : क्राईमचे अधिकारी यांनी आम्हाला आज ११ वाजता चौकशी साठी बोलावले होते. आम्ही तिथे गेलो त्यावेळी आम्हाला सांगण्यात आले की आता बंदोबस्त आहे, आम्हाला वेळ नाही, तुम्ही ४:३० वाजता या ज्या वेळी आम्हाला बेल मिळाली त्यात लिहिले आहे की तुम्हाला चौकशीला जर बोलावले असेल तर तुम्ही वकिलांना बरोबर घेऊन जाऊ शकता. योगेश भोईर यांना ४:३० वाजता आत घेतले. आमच्या वकिलांना आत मध्ये घेतले नाही. हा सर्वात मोठा गुन्हा या पोलिसांनी केला आहे. कोर्टाचा अवमान केला आहे. हे कोणाच्या दबाव खाली केले आहे. आज जे चालले आहे म्हणजे तुम्हाला आम्हाला जर हरवत येत नाही तर तुम्ही आम्हाला जेल मध्ये टाका आणि तुम्ही जिंकणार हे सगळ्या लोकांना दिसत आहे. कायदा सुव्यवस्था कुठे गेले सगळे ? आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असा दावा योगेश भोईर यांच्या पत्नी माधुरी भोईर यांनी केला.