ETV Bharat / state

भाजपची तटस्थ भूमिका? शिवसेना करणार सत्तास्थापनेचा दावा

भाजपने तटस्थ भूमिका घेतल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कुठल्याही पाठिंब्याविना शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करू शकते. राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी विचारणा केली असून, आजचा दिवस शिवसेनेसाठी कसोटीचा ठरणार आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा शिवसेनेकडे नाही. त्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ किंवा भाजपची तटस्थ भूमिका असे दोन मार्ग आहेत.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Nov 11, 2019, 12:26 PM IST

मुंबई - राज्यातील सत्ता स्थापनेचा विषय अधिक रंजक होताना दिसून येत आहे. भाजपने तटस्थ भूमिका घेतल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कुठल्याही पाठींब्याविना शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करू शकते. राष्ट्रवादी पक्षप्रमुख शरद पवार यांनी, कोणताही निर्णय घ्यायचा झाल्यास तो काँग्रेस-राष्ट्रवादी या देन्ही पक्षांमध्ये सविस्तर चर्चा करून घेतला जाईल, असे सूचक वक्तव्य केले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने, आम्ही सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहोत, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सांगितले आहे. राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी विचारणा केली असून, आजचा दिवस शिवसेनेसाठी कसोटीचा ठरणार आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा शिवसेनेकडे नाही. त्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ किंवा भाजपची तटस्थ भूमिका असे दोन मार्ग आहेत.

हेही वाचा - राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा भाजपचा डाव, काश्मीरमध्ये महबूबा मुफ्तीसोबत भाजपचा लव्ह जिहाद होता का?

शिवसेना बहुमताचा आकडा सिद्ध करण्यासाठी काय तडजोडी करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेची मदार असणार आहे. दुसरीकडे शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही यावरून काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. दरम्यान, आज शरद पवार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल अशी आशा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.