ETV Bharat / state

Shiv Sena Shakha Row : निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शिवसेनेच्या शाखांचा वाद चिघळणार; ठाकरे-शिंदे गट आमने-सामने - ShivSena branches dispute will rage

शिवसेनेतील वाद सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने घाईगडबडीत शिवसेना शिंदे गटाला बहाल केली. राज्यात या निकालामुळे तीव्र पडसाद उमटत असून शिंदे-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद रंगला आहे. शिंदे गटाकडून सेनेच्या शाखा आणि कार्यालयांचा ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. तर ठाकरे गटाकडून याला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. दोन्ही गट हमरीतुमरीवर आल्याने आगामी काळात हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

ShivSena Branches Dispute
ठाकरे विरुद्ध शिंदे
author img

By

Published : Feb 19, 2023, 3:35 PM IST

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी मूळ शिवसेना शिंदे गटाची असा महत्त्वपूर्ण निकाल दिला. आयोगाच्या निर्णयानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने शेण खाल्ल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली. शिंदे गटावर ही त्यांनी सडकून टीका केली. मात्र, शिंदे गटाला शिवसेना पक्षाची मान्यता मिळताच, राज्यातील शाखा आणि कार्यालयांवर शिंदे गटाकडून दावा केला जातो आहे.

शाखा, कार्यालयावर दावा: बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर, सुमारे आठ वर्षानंतर शिवसेना भवन बांधण्यात आले. शिवसेनेत 'शिवसेना भवनला' विशिष्ट महत्त्व आहे. शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटाकडून शिवसेना भवनवर दावा केला. मात्र, शिवसैनिकांच्या प्रखर विरोधानंतर शिंदे गटाने नमते घेतले. त्यानंतर शिवसेना भवन समोरील एका इमारतीत प्रति शिवसेना भवन उभारण्याची घोषणा केली. मागील सहा महिन्यांपासून हा वाद सुरू आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा सेनेच्या इमारती, शाखा आणि कार्यालयांवर शिंदे गटाकडून हक्क सांगितला जातो आहे. दापोली, कल्याण, ठाणे, हिंगोली आदी भागात शाखा ताब्यात घेण्यावरून राडेबाजी सुरू आहे.

शाखा ताब्यात घेण्यात मोठी अडचण: मुंबई शिवसेनेच्या २२७ शाखा आहेत आणि मुंबई महानगर प्रदेशात सुमारे ५०० हून अधिक शाखा आहे. शिवसेनेच्या पक्ष वाढीत या शाखा ताठ कणा म्हणून उभ्या राहिल्या. शिवसेनेतील फुटीनंतर अनेक शाखांवर शिंदे गटाने कब्जा मिळवला. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो शाखांतून गायब झाले. त्याऐवजी आनंद दिघे यांचे फोटो प्रत्येक कार्यालयात लागले आहेत. शिंदेंना शह देण्यासाठी मुंबईतील जुन्या शिवसैनिकांनी कंबर कसली आणि ठाकरेंच्या पाठिंब्यासाठी पुन्हा एकदा ढाल होऊन शाखा, कार्यालयात गर्दी वाढवली. त्यातील बहुतांश शाखा, इमारती आणि कार्यालये शाखाप्रमुख, स्थानिक नेते आणि ट्रस्टच्या नावाने आहेत. शाखा, कार्यालये ताब्यात घेण्यास शिंदे गटाची मोठी अडचण झाली आहे.

मुंबई विधिमंडळातील शाखा ठाकरेंकडे: शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर विधिमंडळाचे पडसाद उमटले. शिंदे गटाने विधिमंडळातील कार्यालयावर दावा केला. मात्र, मुंबई विधान भवनातील सेनेचे कार्यालय ठाकरे यांच्या ताब्यात आहे. नागपूर मधील विधानभवनात शिंदे गटाने शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेतले. आता निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे मुंबई विधिमंडळातील कार्यालय शिंदे गट ताब्यात घेतल्यास वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही: निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार सेनेच्या शाखातून काम करावे लागेल. परंतु, अनेक इमारती, शाखा पक्षाच्या नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या इमारती आणि शाखांवर हक्क सांगताना कायदेशीर बाबीचा विचार करावा लागेल. त्यातील शाखा काही लोकांच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे कोणतीही पाऊल उचलण्यापूर्वी, सर्व बाबींचा विचार केला जाईल. आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया : शिवसेनेच्या शाखा कार्यालयांवर शिंदे गटाकडून सुरू असलेल्या दाव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने शेण खाल्ले म्हणून आमच्या शाखा त्या दिशेने जाणार नाहीत. शाखा आणि शिवसैनिक तिथेच बसतील. तेथूनच शिवसेनेचे शाखा म्हणून काम करतील. राहिला प्रश्न शिवसेना भवनचा! त्याला काही होणार नाही. पक्ष आमच्याच आहे, शिवसेना भवनसह शिवसेनेच्या शाखा आणि हजारो शिवसैनिक आमच्यासोबत आहेत, असे राऊत म्हणाले.

हेही वाचा: Kirit Somaiya on Sanjay Raut : कोर्टात अपील करताना संजय राऊत २ हजार कोटींच्या दाव्याचा उल्लेख करणार का? किरीट सोमैय्यांचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.