ETV Bharat / state

मुख्यमंत्री कोणाचा होणार? यासाठी अमित शाहंकडे लक्ष द्या, मुनगंटीवारांचा सेनेला सूचक इशारा - assembly election

मुनगंटीवार यांनी सोमवारी नाशिकमध्ये भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले होते. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक हर्षल प्रधान यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार
author img

By

Published : Jun 11, 2019, 5:23 PM IST

मुंबई - शिवसेना आणि भाजपचा तिढा वाढतच चालला असून शिवसेना अस्वस्थ असताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. मुनगंटीवार यांनी सोमवारी नाशिकमध्ये भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले होते. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक हर्षल प्रधान यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. मुनगंटीवार यांच्याकडे लक्ष देऊ नये, मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे आणि भाजप अध्यक्ष अमित शहा घेतील, असे म्हटले आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार

प्रधान यांच्या वक्तव्यावर मुनगंटीवार यांनी सूचक विधान केले असून माझ्याकडे लक्ष देऊ नका पण, अमित शाह यांच्याकडे लक्ष द्या, असे म्हटले आहे. दिल्लीतल्या बैठकीत अमित शाह यांनीच भाजपचा मुख्यमंत्री व्हायला हवा या उद्देशाने काम करा, असे निर्देश दिल्याचा संदर्भ मुनगंटीवार यांनी दिला. त्यामूळे शिवसेनेला हा सूचक इशारा असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्यामुळे शिवसेनेत कमालीची अस्वस्थता पसरली असून विधानसभा जागा वाटपाबाबत कुणीही वक्तव्य करू नये, असा फतवा मातोश्री वरून काढण्यात आला आहे. मुनगंटीवार यांच्या इशाऱ्याबाबत शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याशी यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.

Intro:या बातमीसाठी सुधीर मुनगंटीवार यांचा byte LIVE U वरून पाठवला आहे.

भाजपचा शिवसेनेला इशारा,अमित शहा यांच्या कडे लक्ष द्या- मुंनगंटीवारांचे सूचक वक्तव्य

मुंबई 11

शिवसेना आणि भाजपचा विधानसभा भाजपचा तिढा वाढतच चालला असून शिवसेना अस्वस्थ असताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. मुनगंटीवार यांनी काल नाशिक मध्ये भाजपचाच मुख्यमंत्री हिणार असल्याचे सांगितले होते. त्यावर शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांकडून नाही तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक हर्षल प्रधान यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. मुनगंटीवार यांच्याकडे लक्ष देऊ नये, मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे आणि भाजप अध्यक्ष अमित शहा घेतील असे म्हटले आहे. प्रधान यांच्या वक्तव्यावर मुनगंटीवार यांनी सूचक विधान केले असून माझ्याकडे लक्ष देऊ नका पण अमित शहा यांच्याकडे लक्ष द्या असे म्हटले आहे. दिल्लीतल्या बैठकीत अमित शहा यांनीच भाजपचा मुख्यमंत्री व्हायला हवा या उद्देशाने काम करा असे निर्देश दिल्याचा संदर्भ मुनगंटीवार यांनी दिला. त्यामूळे शिवसेनेला हा सूचक इशारा असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्यामुळे शिवसेनेत कमालीची अस्वस्थता पसरली असून विधानसभा जागा वाटपाबाबत कुनीही वक्तव्य करू नये असा फतवा मातोश्री वरून काढण्यात आला आहे. मुनगंटीवार यांच्या इशाऱ्या बाबत शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याशी यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. Body:... Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.