ETV Bharat / state

पुढील 3 महिन्यांसाठी शिवभोजन थाळी 5 रुपयात, केशरी शिधापत्रिकाधारकांना ऑगस्टपर्यंत मिळणार सवलतीत धान्य - शिवभोजन थाळी न्यूज

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना पुढील 3 महिन्यांसाठी शिवभोजन थाळीचा दर पाच रुपये असणार आहे. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Shiva Bhojan thali for the next 3 months at Rs.5
पुढील 3 महिन्यांसाठी शिवभोजन थाळी 5 रुपयात
author img

By

Published : Jul 8, 2020, 10:04 PM IST

मुंबई - कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना पुढील 3 महिन्यांसाठी शिवभोजन थाळीचा दर पाच रुपये असणार आहे. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांकरीता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर एपीएल (केशरी) मधील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत व शेतकरी योजनेत समाविष्ट नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना प्रती व्यक्ती 3 किलो गहू 8 रुपये प्रती किलो प्रमाणे व 2 किलो तांदूळ 12 रुपये प्रती किलो याप्रमाणे हे 5 किलो अन्नधान्य मे व जून या 2 महिन्यात दिले आहे. त्याच धर्तीवर जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता त्याच परिमाणात व त्याच दराने अन्नधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या 28 कोटी रुपये एवढा अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे. केंद्र शासनाकडे गहू प्रतिकिलो 21 रुपये व तांदूळ प्रतिकिलो 22 रुपये या दराने मागणी करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

शिवभोजन थाळीचा दर पुढील 3 महिन्यांसाठी 5 रुपये
शिवभोजन थाळीचा दर पुढील 3 महिन्यांसाठी पाच रुपये एवढा करण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी इ. लोकांच्या जेवणाअभावी हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळीची किंमत 30 मार्चपासून तीन महिन्यांच्या कालावधीसाठी दहा रुपयाऐवजी पाच रुपये एवढी निश्चित करण्यात आली होती. ही मुदत पुढील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी वाढवण्यात आली असून 6 कोटी रुपये एवढ्या वाढीव खर्चासही मान्यता देण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.