मुंबई: गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा (Patra Choul Case) प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राऊत यांना 1 ऑगस्ट रोजी अटक केली होती. संजय राऊत यांच्या विरोधात ईडीने मुंबई सत्र न्यायालयात आरोप पत्र दाखल केले आहे तसेच राऊत यांनी जामीनासाठी केलेल्या अर्जाला विरोध दर्शवला असून राऊत यांना जामीन देण्यात येऊ नये असे ईडीच्या वतीने कोर्टात म्हटले आले आहे. संजय राऊत यांना जामीन देण्यात आला तर या प्रकरणातील इतर साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता ईडीने वर्तवली आहे तसेच या प्रकरणातील महिला साक्षीदाराला यापूर्वी राऊत यांनी धमकी दिलेली आहे तसेच त्यांच्यावर या प्रकरणात संबंधित साक्षीदाराने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दिलेली आहे असे ईडीने उत्तरात म्हटलेले आहे.
ईडीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या उत्तरा मध्ये असे म्हटलेले आहे की संजय राऊत यांनी जामीन अर्ज केला त्यावेळी केलेले आरोप निरार्थक आहेत. मनी लॉन्ड्री प्रकरणात संजय राऊत यांच्या विरोधात तपास यंत्रणाकडे पुरावे आहेत. हे पुरावे योग्य वेळी कोर्टासमोर सादर करण्यात येणार आहेत. तसेच राऊत यांच्या वतीने प्रवीण राऊत हे सर्व आर्थिक व्यवहार पाहतात असेही म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत राऊत यांना जामीन देण्यात येऊ नये. त्यामुळे उद्या होणाऱ्या सोनवणे कडे सर्वांचे लक्ष लागलं असून राऊत यांना जामीन मिळतो की पुन्हा जेलमधील मुक्काम वाढतो याकडे सर्वांचे लक्ष (bail hearing on Monday) लागलेले आहे.
प्रवीण राऊत फक्त मोहरा होते खरे सूत्रधार संजय राऊत हेच होते आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत. तसेच राऊतांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचे ईडीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. संजय राऊत यांना जर जामीन मिळाला तर ते पुन्हा धमकाविण्याचे किंवा त्यापुढे जाऊन कृत्य करु शकतात तसेच राऊत यांचे परदेश दौरे बिझनेसमन आणि विविध लोकांकडून पुरस्कृत केले जातात याचे नेमके कारण काय असा सवाल करत प्रवीण राऊत हे संजय राऊतांना दर महिन्याला दोन लाख देत होते ते कशासाठी असा सवालही ईडीने उपस्थित केला आहे.
संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीने केला. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना एचडीआयएल ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आले होते आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती.
संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते असे ईडीने न्यायालयात सांगितले आहे. मग पत्राचाळ गैरव्यवहारातील पैसे असो की दादर येथील घर आणि अलिबाग येथील जमीन सर्व व्यवहार संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आले. येस बँक घोटाळा प्रकरणी वाधवान बंधू यांच्यासोबत प्रविण राऊत यांचे नाव आले असून या प्रकरणीही संजय राऊत यांची भविष्यात ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.