ETV Bharat / state

Kishori Pednekar Summons : किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, दादर पोलिसांचे पुन्हा समन्स - दादर पोलीस किशोरी पेडणेकर समन्स

शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai mayor Kishori Pednekar ) यांना दादर पोलिसांनी ३१ ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ( Dadar Police ) समन्स बजावले आहे. यापूर्वी समन्स बजावल्यानंतर 29 ऑक्टोबर रोजी त्या ( SRA flats scam ) पोलिसांसमोर हजर झाल्या नाहीत.

किशोरी पेडणेकर
किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Oct 30, 2022, 10:11 AM IST

Updated : Oct 30, 2022, 12:13 PM IST

मुंबई : शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai mayor Kishori Pednekar ) यांना दादर पोलिसांनी ३१ ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ( Dadar Police ) समन्स बजावले आहे. यापूर्वी समन्स बजावल्यानंतर 29 ऑक्टोबर रोजी त्या ( SRA flats scam ) पोलिसांसमोर हजर झाल्या नाहीत.

काय आहे आरोप- किशोरी पेडणेकर यांनी २०१७ साली निवडणुकीमध्ये आपल्या शपथपत्रात एसआरएचा पत्ता दिला आहे. इमारत क्रमाक २, वरळी गोमाता जनता एसआरएमध्ये राहत असल्याचे त्यांनी आपल्या शपथपत्रात लिहिलेले आहे. पेडणेकर यांनी अर्धा डझन गाळे हस्तगत केले आहेत. त्याचा हिशोब घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यांनी गरीब झोपडपट्टीवासीयांचे गाळे ढापले आहेत. आम्ही तुम्हाला गाळे देऊ, असे म्हणत लोकांकडून पैसे वसूल करण्यात आले. यासंदर्भातच दादर पोलीस ठाण्याकडून चौकशी सुरू आहे. मी किशोरी पेडणेकर यांचे नाव दिलेले नाही. तर जे लोक फसलेले आहेत, त्यांनीच पेडणेकर यांचे नाव घेतले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना न्यू मरीन लाईन पोलीस ठाण्यानेही या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे, अशी माहिती सोमैय्या यांनी नुकतेच दिली आहे.

तर त्या गाळ्याला टाळे लावा - मुंबईच्या माजी महापौरी किशोरी पेडणाकर म्हणाल्या, की किरीट सोमैय्या ( kishori pednekar SRA Scam ) हे दरवेळी प्रत्येक गोष्टींला विरोधकांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करतात. एसआरएने आधीच कळवलं आहे की माझा संबंध नाही. तरीही वारंवार दबाव तत्रांचा वापर सुरू आहे. एका सामान्य महीलेला तुमचा एक माणुस त्रास देतोय. गोमातानगरमध्ये मी २०१७ ला अर्ज भरला होता. कारण नसताना रान उठवले आहे. गोमातानगरमध्ये काही दुकाने आणि बालवाड्या सोसायटीच्या ताब्यात आहेत. येथे भाड्याने राहणे गुन्हा होता का ? असा प्रश्न विचारत जर गोमाता नगरमधील एक जरी गाळेधारक बोलला की गाळा किशोरी पेडणेकर यांचा आहे तर त्या गाळ्याला टाळे लावा, असे आवाहन किरीट सोमैय्या यांच्यासह मुख्यमंत्र्यांना केले आहे.

Last Updated : Oct 30, 2022, 12:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.