मुंबई - पेट्रोल आणि डिझेलवाडी विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. पेट्रोल दरवाढीवरून केंद्र सरकारची कोंडी करण्यासाठी आज शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. घाटकोपरमध्ये रेल्वे स्थानकाच्या बाहेर शिवसेनेने केंद्र सरकार विरोधात निदर्शने केली.
मनमोहन सिंग यांच्या काळात देखील कच्च्या तेलाचे भाव वाढलेले असतानाही त्याचा अतिरिक्त ताण हा राज्य सरकारवरती आला नव्हता. परंतु, आता केंद्र सरकारची तिजोरी भरण्यासाठी ही दरवाढ केली जात आहे. त्यामुळे या केंद्र सरकारचा धिक्कार करतोय, अशी प्रतिक्रिया शिवसेना कार्यकर्त्यांनी दिली आहे.
हेही वाचा - ईडी चौकशीसाठी आमदार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात हजर
केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर टाकलेला हा दरोडा आहे. मदत करण्याऐवजी सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. काही पैसे कमी करायचे आणि रुपया वाढवायचा असा खेळ केंद्र सरकारचा सुरू आहे. कर रुपात देखील 45 रुपये केंद्राच्या हातात जातात. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीत होरपळून निघालेल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळालाच पाहिजे. कोरोनाचे भीषण संकट असताना प्रत्येक राज्य त्याला सामोरे जात आहे. पण, त्याच दरम्यान केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलची भरमसाट दरवाढ करून सर्व सामन्याचे कंबरडे मोडत आहे. याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करीत असून सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी, असे शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र राऊत यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधातील विविध प्रकारचे फलक झळकावले. 'बेचारी जनता करे पुकार, लूट रही है मोदी सरकार', अशा शब्दांत टीका करण्यात आली.
हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोफळीत दाखल