मुंबई शिवसेना आणि दसरा मेळाव्याच (ShivSena Dussehra Gathering) एक अतूट नातं आहे. मात्र, यंदा दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे गट आमनेसामने (Shinde vs Thackeray over Dussehra gathering) आल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही गटांनी शिवाजी पार्कवर मेळाव्याला (Dussehra Gathering Shivaji Park) परवानगी मिळावी, (Dussehra Gathering Permission Application) यासाठी मुंबई महापालिकेत अर्ज केला आहे. अद्याप कोणालाही परवानगी मिळाली नसल्यानं शिवाजी पार्कवर दसरा मेळावा नक्की कुणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोर्टात जाण्याचा शिंदे गटाचा इशारा (Shinde Group Warns Going To Court On Dussehra Gathering) मागील ५६ वर्षे शिवसेनेचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होत असून यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून लाखो शिवसैनिक (ShivSainik) उपस्थित राहतात. शिवसेना आणि दसरा मेळावा एक अतूट नाते आहे. यंदा मात्र, शिवाजी पार्कवर हा दसरा मेळावा कोणी घ्यायचा ? यावरून उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री शिंदे गट आमनेसामने आला आहे. मेळाव्याच्या परवानगीसाठी पालिकेकडे दोन्ही गटांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र, परवानगी कोणाला द्यायची यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. हे सर्व सुरु असताना शिंदे गटात सामिल झालेले स्थानिक आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar) यांनी शिवाजी पार्क येथेच दसरा मेळाव्याची परवानगी मिळण्याबाबत महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाकडे ३० ऑगस्ट रोजी अर्ज केला आहे.
सदा सरवणकर म्हणाले की, दरवर्षीप्रमाणेच यंदाही दसरा मेळाव्यासाठी मी अर्ज केला आहे. शिवसेनेमध्ये कोणतेही गटतट नसून एकच शिवसेना आहे. एक नैतृत्व, एक मैदान, एक झेंडा, एक विचार हे यंदाच्या दसरा मेळाव्याचे घोषवाक्य आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) मार्गर्शन करतील. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून गेले दोन वर्षे सभागृहात मेळावा साजरा केला जात आहे. हा मेळावा ऑनलाईन पद्धतीने साजरा झाला आहे. असे शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी संगितले. जर आम्हाला परवानगी दिली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ असा इशाराचं यावेळी सरवणकर यांनी शिंदे गटाच्या वतीने दिला.
मनीषा कायंदे सरवणकरांवर भडकल्या आतापर्यंत विभागप्रमुख आणि स्थानिक आमदार म्हणून शिवसेना पक्षाकडून सरवणकर हेच दसरा मेळाव्यासाठी अर्ज करायचे. परंतु, त्यांना विभाग प्रमुख पदावरून हटवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना अर्ज करण्याचा कोणताही अधिकार राहिलेला नाही. शिवसेनेच्या स्थापनेपासून दसरा मेळाव्याला एक मोठा इतिहास आहे. शिंदे गटाला काय इतिहास आहे? जेव्हा सरवणकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तेव्हा अर्ज का केला नव्हता ? अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे (Manisha Kayande)यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी वाद सोडवावा किशोरी पेडणेकरांची मागणी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून वाद निर्माण झाला आहे. याबाबत मुख्यमंत्री हे पद घटनात्मक पद आहे. त्यांनी पुढाकार घेवून वाद सोडवावा असे वरिष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यानुसार, मुख्यमंत्र्यांनी हा वाद सोडवावा असे आवाहन मुंबईच्या माजी महापौर व शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केले आहे.
नवीन कँपेन लाँच शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्क मैदानात होतो. यंदा शिवसेनेतून फुटून वेगळा गट केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाने दसरा मेळावा आम्हीच करणार असे म्हटले आहे. यावर 'दसरा मेळावा शिवतीर्थावरच...मी उद्धवजींसोबत' असे लहान मुले बोलत असल्याचे व्हिडिओ मुंबईच्या माजी महापौर व शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी शेअर करत नवीन कँपेन लाँच केले आहे.
दादरच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळावाबाबत राज्य सरकारच्या नियमानुसार २०१६ मध्ये शिवाजी पार्कवर दसरा मेळावा असे म्हटले आहे. तो कोणी किंवा कोणत्या पक्षाने करावा हे म्हटले नाही. सध्या मुंबईतील गणेशोत्सव सुरळीतपणे पार पाडणे हे आमचे प्राधान्यस्थानी आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर अर्जावर योग्य तो निर्णय घेऊ असे पालिकेच्या जी नॉर्थ विभागाचे पालिका सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे (Municipal Assistant Commissioner Prashant Sapkale) यांनी सांगितले.