मुंबई : एमसीएची निवडणूक पार ( Election of MCA ) पडली. या निवडणुकीमध्ये आशिष शेलार आणि शरद पवार यांचे पॅनल विजय ( Panel Victory of Ashish Shelar and Sharad Pawar ) झाले असून, या फायनल कडून अध्यक्ष पदासाठी उभे असलेले उमेदवार अमोल काळे हे आता एमसीएचे नवे अध्यक्ष झाले आहेत. तर तेथेच भारताचे माजी कसोटीपटू संदीप पाटील यांचा पराभव झाला आहे. अध्यक्षपदासाठी अमोल काळे आणि संदीप पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. काल झालेल्या मतदानानुसार 183 मतं अमोल काळे यांना तर 158 मते संदीप पाटील यांना मिळाली. या निवडणुकीत एमसीएच्या 380 सदस्यांपैकी 300 जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. विजय झाल्यानंतर एमसीएचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमोल काळे यांनी सर्वच मतदारांचे आणि सदस्यांचे आभार मानले.
'हे' पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार : आशिष शेलार आणि शरद पवार यांच्या पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार अमोल काळे यांना 183 मते मिळाली असून सचिव पदासाठी अजिंक्य नाईक यांना 286 अशी सर्वाधिक मते पडली आहेत. तर सचिव पदासाठी अजिंक्य नाईक यांच्या विरोधात उभे असलेले मयंक खांडवाल यांना 35 तर नील सावंत यांना वीस मते मिळाली आहेत. तिथेच खजिनदार म्हणून अरमान मलिक हे विजयी झाले आहेत. अरमान मलिक यांना 162 मते मिळाली. मात्र अरमान मलिक यांच्या विरोधात उभे असलेले जगदीश आचरेकर यांना 161 मते मिळाली होती. यासोबतच कार्यकर्ते सदस्य म्हणून गणेश अत्रेकर यांना 213 मते मिळाली त्यांच्या विरोधात असलेले मलिक मर्चंट यांना 123 मते मिळाली आहेत. तसेच या निवडणुकीमध्ये कार्यकारणी सदस्य म्हणून मिलिंद नार्वेकर, निलेश भोसले, अजय हडप, मसत सुरज, जितेंद्र आव्हाड, मंगेश साटम, संदीप विचारे, प्रमोद यादव हे देखील विजयी झाले आहेत.
अ.क्र. | उमेदवार | मते |
1 | अमोल काळे | 183 |
2 | अजिंक्य नाईक | 286 |
3 | मयंक खांडवाल | 35 |
4 | नील सावंत | 20 |
5 | अरमान मलिक | 162 |
6 | जगदीश आचरेकर | 161 |
7 | गणेश अत्रेकर | 213 |
अमोल काळे यांचा अल्प परिचय : अमोल काळे हे नागपूरचे रहिवासी असून मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ते यादी उपाध्यक्ष राहिले आहेत. राजकारणासह क्रिकेट जगतातही त्यांचं नाव नेहमीच चर्चेत असतं. नागपूरचे असल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही त्यांचे जवळचे संबंध आहेत. अमोल काळे यांनी नागपूर विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच बांधकाम क्षेत्रात व्यावसायिक म्हणूनही त्यांचं नाव आहे.