ETV Bharat / state

'शरद पोंक्षेंवर गांधीवादी लोकांचे आभार मानण्याची वेळ येणे हाच महात्मा गांधींच्या विचारांचा विजय' - जयंत पाटील लेटेस्ट न्यूज

अभिनेते शरद पोंक्षे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर तर्कवितर्क लढवले जात होते. प्रख्यात अभिनेते शरद पोंक्षे यांचा राष्ट्रवादीशी कधीच संबंध नव्हता आणि यापुढेही कधीच नसेल, असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी दिले आहे.

जयंत पाटील
जयंत पाटील
author img

By

Published : Jun 24, 2020, 11:44 AM IST

मुंबई - 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गांधीवादी विचारांचा पक्ष आहे. गांधीहत्येचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीवर गांधीवादी लोकांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानण्याची वेळ यावी, हाच महात्मा गांधींच्या विचारांचा विजय आहे' असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी लगावला. प्रख्यात अभिनेते शरद पोंक्षे यांचा राष्ट्रवादीशी कधीच संबंध नव्हता आणि यापुढेही कधीच नसेल, असेही ते म्हणाले.

अभिनेते शरद पोंक्षे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर तर्कवितर्क लढवले जात होते. प्रख्यात अभिनेते शरद पोंक्षे यांचा राष्ट्रवादीशी कधीच संबंध नव्हता आणि यापुढेही कधीच नसेल, असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले आहे.

महात्मा गांधींची हत्या हे भारतातील पहिले दहशतवादी कृत्य होते. गांधींच्या हत्येचे समर्थन करणारे विचार हे देखील निश्चितच विकृत विचार आहेत, अशी माझी ठाम धारणा आहे, असे पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने बॅकस्टेज कलाकारांना कोरोना काळात तीस लाखांहून अधिक रकमेची आर्थिक मदत करण्यात आली. याबद्दल आभार मानण्यासाठी शरद पोंक्षे हे नाट्य परिषद पदाधिकारी, मराठी नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात आले होते. यापलीकडे शरद पोंक्षे यांचा आणि पक्षाचा कोणताही संबंध नाही व कधीच नसेल, असे जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले.

दरम्यान, शरद पोंक्षे हे प्रदीप दळवी लिखित व विनय आपटे दिग्दर्शित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकात नथुराम गोडसेची भूमिका करत असत. पोंक्षे कायमच गांधी हत्येचे समर्थन करत आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.