मुंबई : राज्यातील खालावत जाणारा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी शरद पवार यांनी पत्राद्वारे केली आहे. याबाबत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना पत्र लिहिले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षाचा पीजीआय अहवाल सादर केला आहे. अहवालनुसार महाराष्ट्र राज्याची दुसर्या स्थानावरून सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. सर्वांगीण शैक्षणिक विकासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत चिंताजनक बाब असल्याची खंत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम : केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाचा परफॉर्मेंग ग्रेडिंग इंडेक्स २.० (पीजीआय) अहवाल प्रसिद्ध केला. दुसऱ्या क्रमांकावर असलेले महाराष्ट्र हे सातव्या स्थानावर पोहोचले आहे. खालावलेला शैक्षणिक दर्जा ही चिंताजनक बाब आहे. याचाच अर्थ पीजीआय अहवालासाठी ज्या निकषांच्या आधारे मूल्यमापन केले गेले, त्याला महाराष्ट्रात गांभीर्याने घेतले गेले नाही. याचाच परिणाम महाराष्ट्राच्या शैक्षणिक गुणवत्तेवर झाला आणि महाराष्ट्राचा क्रमांक घसरला.
विद्यार्थी संख्या कमी : यशवंतराव चव्हाण सेंटर शिक्षण विभागाकडून गेल्यावर्षी, दोन शिक्षकी शाळांचे सक्षमीकरण या विषयावर एक परिषद घेण्यात आली होती. त्यावेळी निरीक्षणे नोंदविण्यात आली होती. राज्यात जिल्हा परिषदेच्या ३८ हजार दोन शिक्षकी शाळा आहेत. त्याही वाड्या-वस्त्यांवर आहेत. तर विद्यार्थी संख्या कमी होत असल्याने, त्या बंद करण्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत सरकारने गंभीर दखल घेण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे.
खालावत जाणारा शैक्षणिक दर्जा : शरद पवार यांनी राज्यातील शाळांचा खालावत जाणारा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी वेळीच उपाययोजना करावी. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पत्र लिहिले आहे. पत्रात म्हटले की, शालेय शिक्षण मंत्र्यांनी गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर बैठका घ्याव्यात. तसेच त्या संदर्भातील कृती कार्यक्रम तयार करावेत. तसेच राज्याला शैक्षणिक संदर्भात अग्रस्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा, शरद पवारांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -
- Ajit Pawar Portfolio : अखेर शिक्कामोर्तब; नवीन मंत्र्यांची खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे सोपवली
- Raj Thackeray Konkan visit : फोडाफोडीचे राजकारण आम्हाला मान्य नाही, राज ठाकरेंचा भाजपला टोला
- Maharashtra Political Crisis: १६ आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस, २ आठवड्यांचा दिला वेळ