ETV Bharat / state

Sharad Pawar Uddhav Thackeray Meeting: उद्धव ठाकरे-शरद पवार यांच्या भेटीत काय चर्चा झाली? जयंत पाटील म्हणाले... - INDIA Coordination Committee

Sharad Pawar Uddhav Thackeray Meeting : शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवास्थानी जाऊन भेट घेतलीय. भेटीचं नेमकं कारण अजून गुलदस्त्यात आहे. इंडिया आघाडीच्या कॉर्डिनेशन कमिटीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भेट झालीय, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना दिलीय.

Sharad Pawar Uddhav Thackeray Meeting
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 6:19 PM IST

जयंत पाटलांची प्रतिक्रिया

मुंबई Sharad Pawar Uddhav Thackeray Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बुधवारी इंडिया आघाडी समन्वय समितीची बैठक पार पडणार आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाबद्दल रणनीती आखाली जाणार आहे. इंडिया आघाडीच्या जागा वाटपाच्या सूत्रावर देखील प्राथमिक चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय.

सध्याच्या राजकीय घडामोडीवर चर्चा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवास्थानी एक महत्वाची बैठक पार पडलीय. बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. तब्बल दोन तास बैठक सुरु होती. राज्यतील सध्याच्या राजकीय घडामोडीवर चर्चा (INDIA Coordination Committee) झालीय.

कॉर्डिनेशन कमिटीची बैठक : इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडली होती. त्या बैठकीमध्ये इंडिया आघाडीची समन्वय समिती तयार करण्यात आलीय. त्या कॉर्डिनेशन कमिटीची बैठक उद्या दिल्ली येथे होणार आहे. त्यापूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतलीय. राज्यातील आणि इंडिया आघाडीच्या संदर्भात देखील चर्चा झालीय. काँग्रेस सोबत उद्धव ठाकरे आहेत. तसंच सर्वच राजकीय मुद्यावर साधकबाधक चर्चा झालीय, अशी माहिती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीय.

लवकरच जागा वाटप : इंडिया आघाडीच्या बैठकीच्या वेळी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची जागा वाटापाबाबत बैठक झालीय. जागा वाटपाचा निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल, याबाबत चर्चा झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण सर्व एकत्र बसून याबाबत लवकरच निर्णय घेणार, असं जयंत पाटील यांनी सांगितलंय. जागा वाटप 30 सप्टेंबरपर्यंत होणार की नाही, याबाबत मला माहिती नाही. मात्र, लवकरात लवकर ही बैठक होईल असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त (Meeting over INDIA Coordination Committee) केलाय. महाराष्ट्रातील विद्यमान खासदार आणि उरलेले जागा सर्वांचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात येणार आहे. लवकरच यावर निर्णय घेऊन महाविकास आघाडीची वज्रमूठ सभादेखील घेण्यात येणार आहे.

हेही वाचा :

  1. Maratha Reservation : आघाडी सरकारच्या काळात तुम्हीच मराठा आरक्षण घालवलं; 'या' नेत्यानं शरद पवारांना सुनावलं
  2. Sharad Pawar On INDIA Bharat Contravesry: गेटवे ऑफ इंडियाला काय म्हणायचं- शरद पवारांचा थेट मोदींना प्रश्न
  3. NCP Political Crisis: अजित पवार गटाला धक्का देण्याच्या तयारीत शरद पवार..निवडणूक आयोगाकडं केली ही' मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.