मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी देखील शरद पवारांनी 2024 चे युद्ध समोर असताना असा निर्णय घेता येणार नाही. देशातील राजकारणावर त्याचे दुरगामी परिणाम होतील, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मांडली. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यभरातून राजीनामा सत्र : पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर राज्यभरातून राजीनामा सत्र सुरु झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले. आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार हतबल वगैरे आहेत, हे आम्हाला काही माहित नाही. पवारांना आता पदावरून जाता येणार नाही. राज्यसभेची तीन वर्षे बाकी आहेत. राज्यसभेवर तीन वर्षे राहा, नंतर राज्यसभेसोबत एकत्र निर्णय घ्या. मात्र, आता दिलेला राजीनामा मागे घ्या, अशी मागणी आव्हाडांनी केली. 2024 चे युद्ध डोळ्यासमोर असताना, संपूर्ण देश शरद पवारांकडे अपेक्षेने बघतो आहे. संपूर्ण देशातील विरोधी पक्ष नेते पवार यांनी एकत्र केले आहेत. अशात पद सोडून कसे काय जाऊ शकतात, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.
सगळेजण पवार यांचे ऐकतात : देशात शरद पवार ताकदवान नेते आहे. देशातील सर्वच पक्षातील नेते पवार साहेबांचे म्हणणे ऐकतात. नितीश कुमार असो, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, स्टॅलिन यांच्यासह वाय. एस. आर च्या मुलाला देखील पवार साहेबांनी एकत्र आणू शकतात. राजकारणात आपल्यापेक्षा देशाचा जास्त विचार करावा लागतो. 2024 च्या निवडणुका तोंडावर असताना, पवारांनी घेतलेला निर्णय घेतला योग्य नाही. तसेच विरोधी पक्षच या निर्णयाने हतबल होईल. पवार साहेबांच्या निर्णयानंतर देशातील अनेक पक्षाच्या नेत्यांनी साहेबांशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे. पी. सी. चाको यांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. मी देखील बहुतांश लोकांची बोललो असून सगळ्यांनी मला शरद पवार असा राजीनामा देऊ शकत नाहीत. पवारांनी राजीनामा दिल्यास या गोष्टीचे दूरगामी परिणाम देशाच्या राजकारणावर होतील, असे विधान आव्हाड यांनी केले.
देशाच्या राजकारणात पवार केंद्रस्थानी : देशाच्या राजकारणीतील केंद्रस्थानी व्यक्तीमत्व म्हणून शरद पवारांची ओळख आहे. कम्युनिस्ट पक्षाने शरद पवारांशी संपर्क साधला आहे. सगळे राजकीय विरोधी पक्ष ज्यांच्या घरात आरामात जातात. आपली भूमिका मांडतात. विरोधी पक्षांसाठी आपुलकीची ती जागा आहे. त्यामुळे पवार साहेब फक्त स्वतःचा विचार नाही करु शकत, माझे वय झाले. मला आता निवृत्त व्हायचे आहे, असे ते म्हणू शकत नाहीत. कारण, सामुदायिक शक्तीचा सन्मान केला पाहिजे, असे सातत्याने सांगत असतात. आज पक्षातल्या ८० टक्के कार्यकर्त्यांकडून एकच सांगण्यात येत आहे. साहेबांनी राजीनामा देऊ नये. लोकभावनेचा सन्मान करायला शिका हे आम्हाला शरद पवारांनी शिकवले आहे. आता या जनभावनेचा पवारांनी आदर करावा राजीनामा देऊ नये, आव्हाड यांनी सांगितले.
राजीनाम्याचा निर्णय देशाला हताश करणारा : शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय पूर्णतः चुकीचा आहे. राजीनामा देण्यापूर्वी कोणाशी ही चर्चा केली नाही. अचानक राजीनामा देण्याचे कारण काय, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय महिला कार्यकारणी सदस्या सोनिया दुआन यांनी केला. पवार साहेबांना पाहून राजकारणात आलो. मात्र, अशा स्वरुपाचा निर्णय देशाला हताश करणार आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पवारांच्या मनधरणीसाठी प्रयत्न : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्ष पदावरुन पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली. राज्यात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, या मागणीसाठी कार्यकर्त्यांकडून आंदोलने, उपोषण सुरू आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आज तिसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. केंद्रीय कार्यकारणी सदस्यांकडून ही पवारांच्या मनधरणीसाठी प्रयत्न सुरु झाले आहे. आज राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या सोनिया दुहान या मुंबईत शरद पवार यांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आल्या होत्या. दरम्यान, त्यांच्याशी या संदर्भात चर्चा केली असता शरद पवारांच्या राजीनाम्यावर भाष्य केले.
त्या घोषणेवरुन माघार घ्यावी : पवार यांनी निर्णय घेताना कोणत्याच व्यक्तींशी चर्चा केली नाही. अचानक निर्णय घेतला. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून राजीनामा मागे घेण्यासाठी विनंती केली जात आहे. आज लाखो कार्यकर्ते पवार साहेबांकडे पाहून राजकारणात आले. देशपातळीवर पवार साहेबांचे वजन असून साहेबांसारखा कोणताही नेता नाही. देशपातळीवरील विरोधकांना एकत्र आणण्याची ताकद पवार साहेबांमध्ये आहे. आजही अनेक नेते मार्गदर्शन घेत असतात. पवार साहेबांनी राजीनाम्याच्या घोषणेवरुन माघार घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी सदस्या सोनिया दुआन यांनी केली आहे.