मुंबई Sharad Pawar : इस्रायल-हमास यांच्यातील युद्धावरून आता भारतात राजकारण सुरू झालं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला पॅलेस्टाइनला पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या भूमिकेवर भाजपाकडून जोरदार टीका करण्यात आली. केद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल यांनी यावरून त्यांच्यावर निशाणा साधला होता. आता शरद पवारांनी त्यांच्या या आरोपांवर पलटवार केलाय.
मोदींचा दाखला देत प्रत्युत्तर : शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दाखला देत भाजपाच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. सोशल मीडियावर वक्तव्य शेअर करताना त्यांनी पॅलेस्टाईनला मदत सुरू ठेवण्याच्या मोदींच्या भूमिकेचं स्वागत केलं. 'पंडित जवाहरलाल नेहरू तसेच अटलबिहारी वाजपेयी यांनी इस्रायल-पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर जे विचार मांडले, तेच विचार मीही मांडले. या दोघांना या दोन देशांदरम्यान सुरू असलेल्या वादावर शांतपणे तोडगा काढायचा होता. मोदींनी आता ते अधोरेखित केल्यायाबद्दल त्यांचं धन्यवाद', असं शरद पवार म्हणाले.
आधीच्या पंतप्रधानांनी पॅलेस्टाईनच्या बाजूनं भूमिका मांडली : 'माझ्या वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या काही भाजपाच्या नेत्यांना अशा संवेदनशील मुद्यावर भारताची भूमिका लक्षात येईल', असंही ते म्हणाले. पंडित नेहरूंपासून इंदिरा गांधीं ते अटल बिहारी वाजपेयी, सर्वांनीच पॅलेस्टाईनच्या बाजूनं भूमिका मांडली होती. दुर्दैवानं आताचे पंतप्रधान इस्रायलची बाजू घेत आहेत. मात्र असं करत असताना ते जमिनीचे मूळ मालक असलेल्या पॅलेस्टाईनकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला.
-
Over the last few days unsolicited advice and comments on ‘X’ and via TV bytes… pic.twitter.com/55Srzdt2o0
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Over the last few days unsolicited advice and comments on ‘X’ and via TV bytes… pic.twitter.com/55Srzdt2o0
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 20, 2023Over the last few days unsolicited advice and comments on ‘X’ and via TV bytes… pic.twitter.com/55Srzdt2o0
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 20, 2023
मोदींनी पॅलेस्टिनच्या अध्यक्षांसोबत संवाद साधला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टिनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्यासोबत आपलं बोलणं झाल्याचं सांगितलं. मोदींनी गाझाच्या अल अहली रुग्णालयात झालेल्या नागरिकांच्या मृत्यूवरही शोक व्यक्त केला आहे. आम्ही पॅलेस्टाईनच्या लोकांना मदत पाठवणं जारी राखू. आम्ही या प्रदेशातील ढासळत चाललेल्या सुरक्षा परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केलीय. या मुद्द्यावर भारताच्या भूमिकेचा आम्ही पुनरुच्चार केला, असं मोदींनी नमूद केलं होतं.
हेही वाचा :
- Supriya Sule : शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यावरुन सुप्रिया सुळेंचं भाजपाला सडेतोड उत्तर
- Israel Hamas Conflict : पियूष गोयल, हिमंता बिस्वा सरमा यांनी माफी मागावी; शरद पवार, सुप्रिया सुळेंवरील टीकेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
- Israel Palestine Conflict : . . तर हमासकडून लढण्यासाठी सुप्रिया सुळेंना गाझात पाठवा; पॅलेस्टाईनच्या समर्थनानंतर शरद पवारांवर 'या' दिग्गज नेत्यांनी डागली तोफ