ETV Bharat / state

'दिल्लीकरांनी भाजपच्या अहंकाराचा पराभव केला, पराभवाची मालिका आता थांबणार नाही' - sharad pawar on bjp

दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या पराभवाची सुरू झालेली मालिका आता थांबणार नाही, असे म्हणत पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. तर, अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

भाजपच्या पराभवाची मालिका आता खंडीत होणार
भाजपच्या पराभवाची मालिका आता खंडीत होणार
author img

By

Published : Feb 11, 2020, 3:20 PM IST

Updated : Feb 11, 2020, 5:18 PM IST

पुणे - दिल्लीकरांनी भाजपच्या अहंकाराचा पराभव केला. भाजपच्या पराभवाची सुरू झालेली मालिका आता थांबणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या विजयानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा देताना भाजपवर जोरदार टीका केली.

भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत धार्मिक वाद पेटवून समाजात तेढ निर्माण करण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र, दिल्लीकरांना ते अजिबात आवडले नाही, असेही ते म्हणाले. शिवाय भाजपच्या नेत्यांची गोळी मारण्याची भाषाही दिल्लीकरांना रूचली नसल्याचे पवार म्हणाले.

दिल्लीत भाजपचा पराभव होणार हे आपल्याला माहितच होते. भाजप हा या देशावरील आपत्ती असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्या राज्यात भाजपला पर्याय देणाऱ्या शक्ती वाढत आहेत. म्हणून भाजप विरोधात सर्वच पक्ष एकत्र येताना दिसत आहे. मोदी-शाह जोडीने देशात दहशत निर्माण केली आहे. त्यांच्या या कृतीला पक्षातीलच काही नेते दबक्या आवाजात विरोध करत आहेत. अंतर्गत नाराजी मोठी आहे. त्याचाही फटका दिल्ली विधानसभा निवडणुकीत बसला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'दिल्लीकरांनी भाजपच्या अहंकाराचा पराभव केला

दिल्लीकरांना केजरीवाल हिच पहिली पसंती होती. त्यांनी केलेल्या कामाला आजचा विजय ही पोचपावती असल्याचे पवार म्हणाले. महिला वर्गात केजरीवाल यांनी केलेल्या कामाचे विशेष कौतुक होते. काँग्रेसची स्थिती या निवडणुकीत तेवढी चांगली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसनेही ४ जागा लढवल्या. मात्र, अपेक्षित यश मिळणार नव्हते याची कल्पना होती. मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे निवडणूक लढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातून एक नवा प्रयोग राबवला गेला. त्याचे प्रतिबिंब आता प्रत्येक राज्यात उमटताना दिसत आहे. हा विजय केवळ दिल्ली पुरता मर्यादित नाही. दिल्लीत देशभरातील लोक राहतात. त्यामुळे त्यांच्या राज्यातही हाच बदल अपेक्षित आहे, असे म्हणत पवारांनी भाजपच्या पराभवाची ही मालिका आता खंडीत होणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला.

Intro:Body:

भाजपच्या पराभवाची मालिका आता खंडीत होणार नाही, दिल्लीकरांनी अहंकाराचा पराभव केला 

मुंबई- 

भाजपच्या अहंकाराचा दिल्लीकरांनी पराभव केला. भाजपच्या या पराभवाची सुरू झालेली  मालिका आता थांबणार नाही अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. दिल्ली विधानसभा निवडणूकीत आम आदमी पार्टीच्या विजयानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेवून आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा देताना भाजपवर जोरदार टिका केली. 

भाजपने दिल्ली विधानसभा निवडणूकीत धार्मिक वाद पेटवून समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र दिल्लीकरांना ते अजिबात आवडले नाही असेही ते म्हणाले. शिवाय भाजपच्या नेत्यांची गोळी मारण्याची भाषाही दिल्लीकरांना रूचली नसल्याचे पवार म्हणाले. दिल्लीत भाजपचा पराभव होणार हे आपल्याला माहितच होते. 

भाजप हा या देशावरील आपत्ती असल्याचे ही त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्या राज्यात भाजपला पर्याय देणाऱ्या शक्ती वाढत आहेत. म्हणून भाजप विरोधात सर्वच पक्ष एकत्र येताना दिसत असल्याचेही ते म्हणाले. मोदी शाह जोडीने देशात दहशत निर्माण केली आहे. त्यांच्या या कृतीला पक्षातीलच काही नेते दबक्या आवाजात विरोध करत आहेत. अंतर्गत नाराजी मोठी आहे. त्याचाही फटका दिल्ली विधानसभा निवडणूकीत बसला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

दिल्लीकरांना केजरीवार हिच पहिली पसंती होती. त्यांनी केलेल्या कामाला आजतचा विजय ही पोचपावती असल्याचे पवार म्हणाले. महिला वर्गात केजरीवाल यांनी केलेल्या कामाचे विशेष कौतूक होते असेही ते म्हणाले. काँग्रेसची स्थिती या निवडणूकीत  तेवढीशी चांगली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसनेही ४ जागा लढवल्या मात्र अपेक्षित यश मिळणार नव्हते याची कल्पना होती. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे निवडणूक लढल्याचे त्यांनी सांगितले. 

महाराष्ट्रातून एक नवा प्रयोग राबवला गेला. त्याचे प्रतिबिंब आता प्रत्येक राज्यात उमटताना दिसत आहे. हा विजय केवळ दिल्ली पुरता मर्यादीत नाही. दिल्ली देशभरातील लोक राहतात. त्यामुळे त्यांच्या त्यांच्या राज्यातही हाच बदल अपेक्षित आहे असे पवार यांनी स्पष्ट करत, भाजपच्या पराभवाची ही मालिका आता खंडीत होणार नाही असा विश्वास व्यक्त केला.  

Conclusion:
Last Updated : Feb 11, 2020, 5:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.