मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याआधी निवडणूक आयोगाला कागदपत्रे पाठवली होती. (Sharad Pawar has given his word) अजित पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनच आमच्याकडून मान्यता दिली गेली होती. हे लवकर सर्वांसमोर येईलच. पक्षप्रमुख आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हेच राहतील (Sharad Pawar changed his words) अशा प्रकारचा निर्णय आम्ही निवडणूक आयोगाला कळविला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्या गोष्टी सांगितल्या. ज्या गोष्टी वर्षभरात घडल्या त्या सगळ्याचा अभ्यास करून अजित पवार नेतृत्वात आम्ही सरकारमध्ये गेलो आहोत. सर्व कायदे तज्ज्ञांसोबत आम्ही चर्चा केली आणि त्यानंतर पुढची पावले आम्ही उचलली आहेत. आम्ही सरकारमध्ये सामील होण्याआधी सगळी कागदपत्रे एकत्र केली आहेत. आम्ही आमदारांच्या साह्य घेतल्या आहेत आणि हे खरे आहे. आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार असतील हे आम्ही ठरवले आहे. पक्षाची घटना आम्ही यात पाळली आहे. सगळ्या गोष्टींची चर्चा करून आम्ही मांडणी केली आहे.
शब्द फिरवता का? - पुढील काळात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जो पक्ष आहे त्यामध्ये माझ्या संदर्भातील निर्णय घेतला जाईल. तो मान्य असेल ते बोलले थांबा तर थांबेन. अजित दादा म्हणाले त्या वाटेला तुम्ही जायचे नाही. शरद पवार यांनी शब्द देऊन शब्द फिरवला. त्याचे पडसाद आम्हाला पाहायला मिळाले आहेत. आमचे म्हणणे होते चर्चा करताय आणि मागे येताय. यामुळे नेत्यांबद्दल राग येणे स्वाभाविक होते. अशा प्रकारचा पाढा अजित पवारांनी काल वाचला आहे.
शेवटपर्यंत प्रयत्न : आम्ही शपथविधी आधी काही मार्ग निघतो का? हे आम्ही रविवारी पर्यंत बघितलं. आमची सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्याशी सुद्धा चर्चा झाली होती. दोन महिन्यांपासून ही चर्चा सुरू होती. मार्ग निघाला नाही आणि मग आम्ही पुढे गेलो.
काय कारण : सगळे आमदार अजित पवारांकडे आले? का आले कारण असेल ना? मी सांगितलं होतं की राज्यात अजित पवार काम पाहतील. दिल्लीत सुप्रिया सुळे काम पाहतील. मात्र, त्यांनी जो निर्णय घ्यायचा तो घेतला. नेते मंडळीना सांगितलं की निर्णय तुम्ही घ्या. आम्ही दोन पत्रं तयार केली. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा नाहीतर सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करा; मात्र जितेंद्र आव्हाड म्हणाले सुप्रिया ताईचं नाव घ्यायचं नाही.
निर्णय लवकर घेऊ? - शरद पवार यांनी सांगितले माझा फोटो वापरायचा नाही. आता त्याबाबत आम्ही सगळे बसून निर्णय लवकरच घेऊ. कुठल्याही पक्षात माझ्यासारख्या माणसाला राजकारणची कुठलीही पार्श्वभूमीवर नसताना अनेक संकटातून जावे लागते. मी लढाई त्यांच्यासाठी लढलो. जीवावर हल्ला होईपर्यंत छगन भुजबळ लढला. काँग्रेसचा मुख्यमंत्री मी झालो असतो पण मी काँग्रेसची ऑफर नाकारली. मी आणि अजित पवार यांनी पक्षाचा प्रचार केला. कोणीतरी भाजपवर सडेतोड टीका करत होते? जे मी बोलत होतो ते गोल-गोल बोलत नव्हतो. तो नेता जो काल माझ्याबद्दल बोलला तो नेता भाजपसोबत जाणार होता. हे खाते द्या ते खाते द्या, म्हणत होता.
विकास कामे रखडली होती : आरक्षणाचा विषय आला तेंव्हा फडणवीस यांना मी फोन केला होता, तेव्हा बोललो. मी आमच्या आरक्षणाबद्दल तुषार मेहता यांना बोललो त्यांनी सहकार्य केले. सारथी बार्टी या सगळ्यामध्ये समानता ठेवा अशी विनंती केली. मी पवारांवर टीका करणार का? असे तुम्ही कसे विचारताय. ईडीची आतापर्यंतची भीती होती का? याबद्दल मी काल बोललो की, आमच्यातल्या अनेकांची चौकशी झाली त्यात क्लीन चिट मिळाली. हसन मुश्रीफची चौकशी सुरू आहे. भाजपासोबत चर्चा करून आम्ही तुमच्या सोबत जात नव्हतो. म्हणून याचे पडसाद पाहायला मिळत होते. याचा अर्थ आमची काम केली जात नव्हती. अनेक प्रकल्पांच्या विकास कामांना स्थगिती दिली जात होती. आम्हाला तपास यंत्रांणाची भीती नव्हती, असे भुजबळ म्हणाले.
खाते वाटप लवकरच : आमच्यासोबत 42 ते 43 आमदार आहेत. त्यांची शपथपत्र आलेली आहेत. काम अजून सुरू आहे. शिंदे गट नाराज आहे ह्या बातम्या तुम्ही सांगताय. मात्र, असं काही नाही. खातेवाटप लवकरच होईल खाते वाटप संदर्भात चर्चा करायला वेळ मिळाला नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.
हेही वाचा:
- Maharashtra Political Crisis : 'एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला कुठलाही धोका नाही, तर अजित पवार...'
- Maharashtra Political Crisis Update: भ्रष्टाचार भाजपच्या रक्तात, जागा दाखविल्याशिवाय शांत बसणार नाही-नाना पटोले
- Maharashtra Political Crisis : नाशकात पुलोद पॅटर्नची अपेक्षा ; छगन भुजबळांना शह देण्यासाठी शरद पवार घेणार बैठक