ETV Bharat / state

Sharad Pawar Resignation Withdraw : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवारच; मात्र... - शरद पवार यांची पत्रकार परिषद

राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचा निर्णय शरद पवार यांनी मागे घेतला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबतची घोषणा केली आहे. तसेच राजीनाम्याबाबत अजित पवारांना कल्पना दिली होती. मात्र, माझ्या इतर सहकाऱ्यांना कल्पना नव्हती असे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar
Sharad Pawar
author img

By

Published : May 5, 2023, 4:58 PM IST

Updated : May 5, 2023, 10:03 PM IST

शरद पवार यांची पत्रकार परिषद

मुंबई - राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष राज्यसभा खासदार शरद पवार यांनी त्यांचा पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेतला आहे. ते आज मुंबईतील यशंवतराव चव्हान सेंटर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, लोक माझे सांगाती आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन वेळी अध्यक्ष पदावरुन निवृ्त्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु मी घेतलेल्या निर्णयाने जनमानसामध्ये तीव्र भावना उलथली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, माझे सांगाती असलेल्या जनतेत अस्थिरता निर्माण झाली होती. मी माझ्या निर्णयाचा फेर विचार करावा अशी मागणी असंख्य कार्यकर्त्यांनी केली होती. तसेच माझे हितचिंतक, माझे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होऊन माल राजीनामा मागे घेण्याचे अव्हान केले.

कार्यकर्त्यांच्या भावानाचा आदर : देशातून राज्यातून विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मी अध्यक्ष पदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी ही विनंती केली. लोक माझे सांगती हे माझ्या जीवननाचे गमक आहे. माझ्याकडून अशा भावाचा अनादर होऊ शकत नाही. जनतेमधील विश्वासामुळे मी भारावून गेलो आहे. मी माझ्या निर्णय मागे घेत आहे. समितीने घेतलेल्या निर्णयाचा मी विचार केला असून देशातील कार्यकर्त्यांच्या भावानाचा आदर राखत मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद स्विकारत आहे. मी संघटनेमध्ये उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक आहे असे प्रतिक्रिया शरद पवार यांनी केली आहे.

राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी काम करणार : माझ्या कार्याकाळात संघटनात्मक, नविन नेतृ्तव निर्माण करण्यासाठी सहकार्यांची मदत घेणार आहे. यापुढे राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी, पक्ष प्रतिमा जनमानसात वाढवण्यासाठी जोमाने काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आपण दिलेली साथ हीच माझी प्रेरणा आहे. माझ्या जीवनात तुम्ही सर्व यश-अपयशात सांगाती राहिलात त्याबद्दल मी सर्वांचा अभारी असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

राजीनामा समितीने फेटाळला - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदावरून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, पवारांच्या या भूमिकेला कार्यकर्ते,नेत्यांनी विरोध केला आहे. शरद पवार यांनीच पक्षाचे कायम अध्यक्ष राहावे, यावर कार्यकर्ते ठाम आहेत. अध्यक्ष निवडीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची आज बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा एकमताने फेटाळण्यात आला आहे.

कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष - शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. राष्ट्वादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन, उपोषण करत शरद पवार यांच्या राजीनामा निर्णयाला विरोध केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्ष निवड समितीने आज शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे. त्यामुळे शरद पवार हे राजीनामा मागे घेण्यासाठी सकारात्मक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्वादीच्या कर्यकर्त्यांनी ढोल-ताशा वाजवत जल्लोष साजरा केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा शरद पवार यांनी दिला होता. त्यावर राज्यात मोठा राजकीय गदारोळ सुरू झाला. हा राजीनामा मागे घेण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शरद पवार यांना केले जात आहे. तसेच राष्ट्रवादीच्या समितीनेही शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे.

  • हेही वाचा -
  1. Sharad Pawar Resign Rejected : शरद पवारांचा राजीनाम्याचा निर्णय गुलदस्त्यात, राजीनामा एकमताने फेटाळला
  2. Sharad Pawar Young Brigade : शरद पवारांची यंग टीम आली समोर; अजित पवार, सुप्रिया सुळे गायब
  3. Ajit Pawar and Supriya Sule : अजित पवार-सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेला गैरहजर; शरद पवार म्हणाले...

Last Updated : May 5, 2023, 10:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.