ETV Bharat / state

'संचारबंदीच्या काळात तरुणांनी विविध पुस्तके वाचावित' - संचारबंदी

संचारबंदीच्या काळात तरुणांनी बाहेर न पडता घरात राहून पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला.

शरद पवार
शरद पवार
author img

By

Published : Apr 2, 2020, 3:54 PM IST

Updated : Apr 2, 2020, 4:54 PM IST

मुंबई - आपल्याकडे उत्तम साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे तरुणांनी संचारबंदीच्या काळात बाहेर न पडता विविध पुस्तकांचे वाचन करावे. वाचनामुळे आपले ज्ञान आणि व्यक्तिमत्व वाढते. त्यामुळे संचारबंदीच्या काळात तरुणांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचावित, असे आवाहन राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी केले आहे.

संवाद साधताना शरद पवार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पवार हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांशी संवाद साधत होते. ते पुढे म्हणाले, की संचारबंदीच्या काळात घराबाहेर पडू नये. या व्यतिरिक्त महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण यांचे विपुल लिखाण आपल्या साहित्य क्षेत्रात उपलब्ध आहे. त्याचा आस्वाद घेऊन आपले ज्ञान वाढवण्याचे काम करा, असे सुचविले.

तरुणांमध्ये टाळाबंदीचे दहा दिवस झाले. आता पुढे काय करायचे ही चिंता आहे. मी कालपासून गीतरामायण ऐकत आहे. मनाला आगळे समाधान मिळतेय. त्यामुळे जे जे काही आपल्या आवडीचे आहे ते करत राहा. आपल्याला आवाहन करतो की वाचन आणि आपली संस्कृती जपण्यासाठी काही करता आले तर बघा, असेही पवार म्हणाले.

हेही वाचा - शरद पवार यांच्या लाईव्हवर शिक्षकांनी व्यक्त केली अनुदानाची चिंता

Last Updated : Apr 2, 2020, 4:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.