ETV Bharat / state

मुंबईतून ४ दिवसात ६ पंपिंग स्टेशनद्वारे १,७१४ कोटी लिटर पाण्याचा उपसा

author img

By

Published : Aug 6, 2020, 9:56 PM IST

मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले. साचलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी पालिकेने ६ पंपिंग स्टेशन उभारली आहेत. या पंपिंगस्टेशनद्वारे ३ ते ६ ऑगस्ट या ४ दिवसात १७ हजार १४५ दशलक्ष लिटर म्हणजे १ हजार ७१४ कोटी लिटर पाण्याचा उपसा केला म्हणजेच समुद्रात सोडण्यात आले.

पाण्याचा उपसा
पाण्याचा उपसा

मुंबई : मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यावर पावसाचे पाणी सखल भागात साचते. साचलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी पालिकेने ६ पंपिंग स्टेशन उभारली आहेत. या पंपिंगस्टेशनद्वारे ३ ते ६ ऑगस्ट या ४ दिवसात १७ हजार १४५ दशलक्ष लिटर म्हणजे १ हजार ७१४ कोटी लिटर पाण्याचा उपसा केला म्हणजेच समुद्रात सोडण्यात आले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ८ हजार ०४६ दशलक्ष लिटर क्षमता असणाऱ्या तुळशी तलावापेक्षा दुप्पट पाण्याचा निचरा करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मुंबईत सोमवार रात्रीपासून मुसळधार पाऊस पडल्याने मंगळवारी मुंबईची तुंबई झाली. मंगळवारी रात्री, पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने बुधवारी पुन्हा मुंबई तुंबली. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले. ३ ऑगस्ट ते आज ६ ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत चार दिवसात ६ पंपिंग स्टेशनद्वारे तब्‍बल १७ हजार १४५ दशलक्ष लिटर म्हणजेच १ हजार ७१४.५० कोटी लिटर एवढ्या पाण्‍याचा उपसा करण्‍यात आला. ४ दिवसांच्‍या कालावधी दरम्‍यान पावसाच्‍या पाण्‍याचा सर्वाधिक उपसा हा लवग्रोव्‍ह पंपिंग स्टेशनद्वारे करण्‍यात आला. या केंद्राद्वारे ४ हजार ४८४.८८ दशलक्ष लिटर एवढ्या पाण्‍याचा उपसा करण्‍यात आला. या खालोखाल हाजी अली पंपिंग स्टेशनमधून ३ हजार ३२२.८० दशलक्ष लिटर, क्लिव्‍हलँड बंदर पंपिंग स्टेशनमधून २ हजार ७६६.९६ दशलक्ष लिटर, इर्ला पंपिंग स्टेशनमधून २ हजार ५३३.६८ दशलक्ष लिटर, ब्रिटानिया पंपिंग स्टेशनमधून २ हजार ४८४.३६ दशलक्ष लिटर आणि गजदरबंध पंपिंग स्टेशनमधून१ हजार ५५२.३२ दशलक्ष लिटर असा एकूण १७ हजार १४५ दशलक्ष लिटर पाण्‍याचा उपसा ६ पंपिंग स्टेशनद्वारे करण्यात आला. या ६ सहाही पंपिंग स्टेशनमध्ये असलेले ४३ पंप गेले ४ दिवस सतत चालू होते. सर्व पंपांचा विचार करता एकूण ८७० तास व २३ मिनिटे कार्यरत होते.

कुठे आहेत पंपिंग स्टेशन -

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी वरळी येथील हाजी अली, लव्हग्रोव्ह, वरळी गावातील क्लीव्हलँड बंदर, रे रोड येथील ब्रिटानिया, जुहू येथील ईर्ला आणि सांताक्रूझ येथील गजदरबंध या ६ ठिकाणी पंपिंग स्टेशन बांधण्यात आली आहेत. यात ४३ पंप कार्यरत आहेत. पावसाचे व उदंचन केंद्रांमध्ये वाहून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन हे पंप संगणकीय प्रणालीद्वारे कार्यरत होतात.

एकूण क्षमता किती -

मुंबईत वरळी येथील हाजीअली, लव्हग्रोव्ह, वरळी गावातील क्लीव्हलँड बंदर, रे रोड येथील ब्रिटानिया, जुहू येथील ईर्ला आणि सांताक्रूझ येथील गजदरबंध या ६ पंपिंग स्‍टेशन कार्यरत आहेत. या ६ स्टेशनमध्‍ये एकूण ४३ पंप असून यापैकी प्रत्‍येक पंपाची क्षमता प्रति सेकंदाला ६ हजार लिटर पाण्‍याचा उपसा करण्‍याची आहे. ४३ पंपांचा विचार करता प्रत्‍येक सेंकदाला २ लाख ५८ हजार लिटर एवढ्या पाण्‍याचा उपासा केला जातो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.